घरट्रेंडिंगCoronaVirus: इटलीत कोरोनाचं सावट, तरी लोकांनी केली वाईन पार्टी!

CoronaVirus: इटलीत कोरोनाचं सावट, तरी लोकांनी केली वाईन पार्टी!

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोक स्वतःला क्वारंटाईन करत आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंग देखील ठेवत आहे. अमेरिका, स्पेन, इटली या देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. सध्या इटलीमधला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इटलीतील लोक शेजाऱ्यांसोबत वाईन पार्टी करताना दिसत आहे. इटलीत कोरोनाचे २१ हजाहून अधिक बळी गेले असून सुद्धा इटलीतील वाईन पार्टी करताना दिसत आहे. मात्र इटलीतील या लोकांनी सोशल डिस्टिंगचे भान राखून आणि लॉकडाऊन पालन करून ही पार्टी बाल्कनीतून केली आहे.

व्हिडिओमध्ये इटलीतील लोक एकत्र येऊन वाईन पार्टी करताना दिसत आहेत. त्यांनी वाईनच्या ग्लासला एक लाकडी काठी बांधली आहे. प्रत्येक जण आपल्या बाल्कनीत येऊन त्या काठीच्या साहाय्याने चेअर्स करताना दिसत आहे. या वाईन पार्टीचा व्हिडिओ मॉरो रॅकिग्लियानो याने शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना नेबरहुड टोस्ट असं लिहलं आहे.

- Advertisement -

Brindisi di quartiere ???To use this video in a commercial player or in broadcasts, please email licensing@storyful.com

Mauro Ricigliano ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 13, 2020

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही वेळात तो व्हायरल झाला. आतापर्यंत या व्हिडिओला ७५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३.१ लाख लोकांनी शेअर केला आहे. आतापर्यंत इटलीमध्ये कोरोनाचे १ लाख ६२ हजार ४८८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २१ हजार ६७ जणांची मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची आकडा २० लाख २४ हजार ६२२ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा १ लाख २८ हजार ९६५वर पोहोचला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: कोरोना रोखण्यासाठी २०२२ पर्यंत सोशल डिस्टन्सिंग सांभाळा!


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -