घरदेश-विदेशNational Mathematics Day 2021 : आज राष्ट्रीय गणित दिवस का साजरा होतो?...

National Mathematics Day 2021 : आज राष्ट्रीय गणित दिवस का साजरा होतो? त्यामागचे कारण काय?

Subscribe

भारतात दरवर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्म दिवस आहे. साल २०१२ पासून त्यांचा जन्मदिवस हा भारतात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी गणिताला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली, त्यांनी दिलेल्या प्रमेय आणि सूत्रांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. त्यामुळे गणित या विषयात त्यांचे मोलाचे योगदान आहे. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याविषयी –

दरवर्षी २२ डिसेंबरला रामानुजन यांच्या गणित विषयातील मोलाच्या योगदानाची आठवण काढली जाते. फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या साऱ्याची सर्वांनाच माहिती त्यांनी जगाला दिली. त्यामुळे राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त  शालेय स्तरापासून विद्यार्थांना गणिताची गोडी लागावी, गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी देशभरातील अनेक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजच्या नव्या पिढीचा गणिताकडे कल वाढावा हा यामागचा उद्देश आहे.

- Advertisement -

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी चेन्नई कोईंबतूर जिल्ह्यातील ईरोड येथे एका सामान्य कुटुंबात झाला. श्रीनिवास रामानुजन यांना गणित विषयाची खूप आवड होती आणि ते या विषयात पूर्ण गुण मिळवायचे. मात्र इतर विषयात ते नापास होत असे. त्यांचे पूर्ण लक्ष फक्त गणितावर असायचे. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्यांनी त्रिकोणमितीमध्ये प्रावीण्य मिळवले आणि अनेक प्रमेय विकसित केली.

श्रीनिवास रामानुजन यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि तेथे त्यांनी गणितात खूप योगदान दिले. रामानुजन त्यांच्या अपूर्णांकांसाठी ओळखले जातात. त्यांनी हायपरमेट्रिक समीकरण, रीमॅन समीकरण, झेटा फंक्शन आणि लंबवर्तुळाकार समीकरणांवर त्यांनी काम केले.

- Advertisement -

श्रीनिवास रामानुजन यांचे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी निधन झाले. त्यांना क्षयरोग झाल्याने २६ एप्रिल १९२० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीनिवास रामानुजन यांचे योगदान आजही स्मरणात आहे आणि गणिताच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक त्यांच्या नावावर आहे. ज्याचे नाव रामानुजम प्राईज फॉर यंग मॅथेमॅटीशियन अवॉर्ड आहे.

२०१५ मध्ये त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘The Man Who Knew Infinity’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. १९७६ मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या पुस्तकालयात एक जुनं रजिस्टर मिळालं होतं. ज्यामध्ये अनेक प्रमेय आणि सूत्र लिहिण्यात आली आहेत. या प्रमेयांना अद्याप कोणीही सोडवू शकलं नाहीत. हे रजिस्टर ‘रामानुजन नोट बुक’ या नावेही ओळखलं जातं.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -