घरताज्या घडामोडीNCP : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली...

NCP : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली उमेदवारी?

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपनंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही मंगळवारी रात्री उमेदवार यादी जाहीर केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपनंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही मंगळवारी रात्री उमेदवार यादी जाहीर केली आहे. परंतू, ही उमेदवार यादी लोकसभा निवडणुकांसाठी नसून अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यंदा अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. (ncp ajit pawar group declared first list of candidates for arunachal pradesh assembly election 2024)

गतवर्षी सात राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मिझोराम या राज्यातील निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूक होणार आहे. ही विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून लढवण्यात येणार असून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अरुणाचल प्रदेशातील याचुली, पंगिन, पक्के- केसांग, चांगलांग उत्तर, नामसांग, मेहचूका, मनियांग जेकु, चांगलांग दक्षिण या विधानसभा मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अरुणाचल प्रदेशात इतर पक्षांनी उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इतर जागांवरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत 6 उमेदवारांना जिंकवत जनतेने आशीर्वाद दिला होता. आता देखील जनता आशीर्वाद देईल असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

  • लिखा साया – याचुली विधानसभा
  • तपंग तलोह – पंगिन विधानसभा
  • लोमा गोलो – पक्के केसांग विधानसभा
  • न्यासन जोंगसम – चांगलांग उत्तर
  • नगोलिन बोई – नामसांग विधानसभा
  • अजू चिजे – मेहचुका विधानसभा
  • मोंगोल यामसो – मनियांग जेकू विधानसभा
  • वकील सलमान मोंगरे – चांगलांग दक्षिण विधानसभा

हेही वाचा – LokSabha 2024 : आईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी…; भोजपुरी स्टार पवन सिंह यांचा पुन्हा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -