घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार १४ मार्च २०२४

राशीभविष्य : गुरुवार १४ मार्च २०२४

Subscribe

मेष – सामाजिक कार्यात मित्र परिवाराची मदत होईल. हवापालट करण्यामुळे मन उल्हासित होईल. नवीन परिचय होईल.
वृषभ – कामात व्यस्त राहा. जे मिळाले आहे त्यात तुमचे कौशल्य दाखवा. वर्चस्व वाढवा. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन – चांगले काम केल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल.
कर्क – खर्चाचा ताळ-मेळ बसवता येईल. डोळ्यांची काळजी घ्या. प्रवासात धंद्याला पोषक चर्चा होईल. व्यक्तीचा परिचय होईल.
सिंहः- मनावरील दडपण कमी होईल. कुटुंबातील चर्चा सफल होईल. वाटाघाटीत यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल.
कन्या – कामात तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. हाय ब्लडप्रेशरचा त्रास होण्याची शक्यता आहे. राग वाढेल. संयम बाळगा.
तूळ – आप्तेष्ठांचा फोन येईल. महत्त्वाच्या विषयावर बोलणी करता येईल. जुने येणे वसूल करा. सामोपचाराने गैरसमज संपवा.
वृश्चिक – कामाची नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. धंद्यात लाभ होईल. नोकरवर्गाचे कौतुक करा. चांगली संगत ठेवा.
धनु – महत्त्वाच्या विषयावर तुम्हाला चर्चा करता येईल. कला-क्रीडा स्पर्धा जिंकाल. मान-सन्मान मिळेल. धंद्यात लाभ होईल.
मकर – सामाजिक कार्यात अहंकार ठेवू नका. गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृतीवर ताण पडेल. धंद्यात लक्ष द्या.
कुंभ – कुटुंबातील वाटाघाटी संबंधी चर्चा कराल. तुमचे मत ग्राह्य धरले जाईल. व्यवसायात परिवर्तन संभवते. वाहन-घर खरेदी कराल.
मीन – तुमच्या बोलण्यातून कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. कायदा मोडून वागल्यास त्रास होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -