घरमुंबईठाण्यात करोनारुग्णांमध्ये तरुण जास्त

ठाण्यात करोनारुग्णांमध्ये तरुण जास्त

Subscribe

२१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक रूग्ण

ठाणे महापालिका हद्दीत करोनाबाधित रूग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे २१ ते ४० वयोगटातील आहेत. साधारण ही आकडेवारी ४६ टक्यांपर्यंत आहे, आतापर्यंत ठाण्यात ५० रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात ४१ ते ६० वयोगटातील ४३ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे वयोवृध्द नागरिकांबरोबरच तरुणांनाही काळजी घ्यावी लागणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारी नवीन ८८ रूग्णांची भर पडली. त्यामुळे रूग्ण संख्या ११७८ झाली आहे. त्यापैकी ३०३ जण हे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे होणा-या रुग्णांची संख्याही अधिक आहे. सध्या ८२५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी दोघांचा मृत्यू झाल्याने मृत्यू संख्या ही ५० वर पोहचली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ५१ ते ६० वयोगटातील २० रुग्ण आहेत.

- Advertisement -

ठाणे महापालिका हद्दीत दिवसागणिक रूग्ण संख्या वाढत आहे. लोकमान्य व सावरकरनगर प्रभाग समितीत सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. तसेच नौपाडा वागळे आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातही रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील घेाडबंदर परिसरात १२ मार्चला करोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मात्र दोन महिन्यात करोनाच्या रुग्णांंनी एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या रुग्णांमध्ये सर्वाधिक हे तरुण वयोगटातील आहेत. सर्वाधिक १७४ रुग्ण हे ३१ ते ४० वयोगटातील आहेत. त्या खालोखाल त्यामुळे २१ ते ३० आणि ४१ ते ५० वयोगटात शंभराहून अधिक रूग्ण आहेत. तरुण वयोटातील रूग्ण संख्येचे टक्केवारी ४६ टक्यापर्यंत पोहचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -