घरताज्या घडामोडीतळघरात ६५० लॉकर, कोट्यवधी रुपयांच्या नोटा माजी IPS च्या घरात सापडलं घबाड

तळघरात ६५० लॉकर, कोट्यवधी रुपयांच्या नोटा माजी IPS च्या घरात सापडलं घबाड

Subscribe

काही दिवसांपूर्वी लखनौमधील अत्तर विक्रेता पीयूष जैन या व्यापाऱ्याच्या घरातील तळघरात पैशांच्या राशी सापडल्या होत्या. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता दिल्लीतील नोएडामध्ये अशीच माया गोळा करणाऱ्या एका माजी आयपीएस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरएन सिंह असे त्याचे नाव असून गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या घऱावर छापेमारी सुरू आहे. सिंह याच्या घरातील तळघरात तब्बल ६५० लॉकर सापडले आहेत. त्यात कोट्यवधी रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा देशात या छापेमारीची चर्चा होत आहे.

- Advertisement -

आरएन सिंह यांनी मात्र आपला मुलगा घऱात प्रायव्हेट लॉकर्स फर्म चालवत असल्याचे सांगितले आहे. तसेच हे लॉकर्स भाड्याने दिले जातात. यातील पैसे माझे नसून इतरांचे आहेत. माझे फक्त दोनच लॉकर असल्याचा दावा केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सिंह यांच्या घरात छापेमारी सुरू आहे. सिंह हे डीजी पदावरही कार्यरत होते. तसेच मी येथे राहत नसून गावी राहतो. येथे मुलगा राहत असून त्याचा लॉकर भाड्याने देण्याचा बिझनेस असल्याचे सिंह यांनी पोलिसांना सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -