घरताज्या घडामोडीKim Jong Un: उत्तर कोरियावर उपासमारीची वेळ, हुकूमशहा किम जोंग उनने ...

Kim Jong Un: उत्तर कोरियावर उपासमारीची वेळ, हुकूमशहा किम जोंग उनने कमी केले २० किलो वजन, पहा फोटो

Subscribe

उत्तर कोरियावर आलेली उपासमारीच्या काळात किम जोंग उन यांचे वजन कमी झाल्याचे वृत्त सर्वत्र चर्चीले जात आहेत

उत्तर कोरियावर गेल्या काही दिवसांपासून उपासमारीची वेळ आली आहे. अनेक लोक अन्नावाचून तडफडत आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी उपासमारीशी लढण्यासाठी नवीन फरमान काढले आहे. किंम जोंग उन यांनी उपासमारीपासून वाचण्यासाठी देशातील लोकांना केवळ एकच वेळ जेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या निर्णायामुळे देशातील वृद्ध आणि लहान मुलांचे वाईट हाल झाले आहेत. तसेच हुकुमशहा किम जोंग उन यांनी देखील तब्बल २० किलो वजन कमी केले आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्त यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संसदीय बैठकीत किम जोंग उन यांचे २० किलो वजन कमी झाले असून त्याची प्रकृती अत्यंत उत्तम असल्याचे सांगितले.

उत्तर कोरियावर आलेली उपासमारीच्या काळात किम जोंग उन यांचे वजन कमी झाल्याचे वृत्त सर्वत्र चर्चीले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून किंम जोंग उन आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत असल्याचे वृत्त समोर आले होते. किम जोंग उन यांनी देशातील नागरिकांना २०२५पर्यंत कमी भोजन करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियात आलेले उपासमारीच्या संकटाने किम जोंग उन यांनी अनेक कारणे दिली आहेत. अन्नपुरवठा खंडित झाल्याने आणि कृषी क्षेत्रातील अनियमित उत्पादनामुळे देशावर उपासमारीचे वेळ आली. देशात गहू आणि इतर खाद्या पदार्थांची टंचाई निर्माण झाली असून २०२५पर्यंत ही परिस्थिती कायम असेल असे सांगितले आहेत.

- Advertisement -

उत्तर कोरियात यंदा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. किम जोंग उन यांनी एप्रिल महिन्यात या कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी मुश्किल मार्च सुरू केला. उत्तर कोरियात नव्वदीच्या दशकात आलेल्या उपासमारीमुळे जवळपास ३० लाख लोकांना मृत्यू झाला होता.

हुकुमशहा किम जोंग उनच्या एका मुख्य स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरिया आणि चीन यांच्यातील सीमापार व्यापार पुढील चार वर्ष सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे २०२५पर्यंत उत्तर कोरियातील उपासमारी कायम राहील.

- Advertisement -

हेही वाचा – Agni-5 Missile : वाऱ्याच्या २४ पट वेगवान अग्नि ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -