घरताज्या घडामोडीOLA भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर

OLA भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर

Subscribe

भारतीयांना स्वस्त आणि सुलभ वाहन उपलब्ध होणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

भारतात कॅब सर्व्हिस पुरवणारी ओला ही प्रसिद्ध कंपनी आहे. लवकरच भारतीय बाजारपेठांमध्ये ओला कंपनीच्या कार आणि स्कूटर पहायला मिळणारा आहे. ओला लवकरच त्यांची कार आणि स्कूटर भारतात लाँच करणार आहे. ओलाच्या ह्या स्कूटर आणि कार मेक इन इंडिया असणार आहे. त्याचे संपूर्ण मॅन्युफॅक्चरींग हे भारतात केले जाणार आहे.

ओला ही भारतातील कॅब सर्व्हिस देणारी सर्वात मोठी कंपनी आहे. ओला भारतात लाँच करणारी कार आणि स्कूटर ही इलेक्ट्रिक असणार आहे. येत्या काळात ओला कंपनी भारतात एक लाख इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर २०२१च्या सुरूवातीला लाँच केली जाणार आहे. ही स्कूटर इलेक्ट्रिक मॉबिलिटी प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे भारतीयांना स्वस्त आणि सुलभ वाहन उपलब्ध होणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

ओला जानेवारी महिन्यात आपली पाहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलो मीटरपर्यंत चालेल असा दावा ओला कंपनीने केला आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक मॉबिलीटीला जास्त प्रोत्साहन दिले जाणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्स या छोट्या छोट्या शहरांपर्यत पोहचवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. त्यामुळे या काळात इलेक्ट्रिक वाहने बनवण्याकडे कल आहे. इलेक्ट्रिक स्कूटर तसेच इलेक्ट्रिक फोर व्हिलरही बाजारात येणार आहेत, असे ओलाचे अध्यक्ष भावीस अग्रवाल यांनी सांगितले.


हेही वाच – PM Wifi योजना: देशात उघडणार १ कोटी डेटा सेंटर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -