घरक्रीडाIND vs AUS : कांगारूंना धक्का; डेविड वॉर्नर पहिल्या कसोटीला मुकणार   

IND vs AUS : कांगारूंना धक्का; डेविड वॉर्नर पहिल्या कसोटीला मुकणार   

Subscribe

पहिल्या कसोटी सामन्याला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 

भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे चाहत्यांचे विशेष लक्ष आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख सलामीवीर डेविड वॉर्नर १७ डिसेंबरपासून अॅडलेड येथे प्रकाशझोतात (डे-नाईट) होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. वॉर्नरला एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. वॉर्नर पहिल्या कसोटीत खेळणार नसला तरी दुसऱ्या कसोटीत त्याचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन होऊ शकेल.

माझी दुखापत बरी होत आहे. मात्र, कसोटी सामना खेळण्यासाठी, धावा काढण्यासाठी आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी मी पूर्णपणे फिट आहे, याची मला स्वतःला खात्री पटल्याशिवाय मी मैदानात उतरणार नाही. मी अजून पूर्णपणे फिट नसून आणखी १० दिवस विश्रांती केल्यास मला फायदा होऊ शकेल, असे वॉर्नर म्हणाला. वॉर्नरची दुखापत फार गंभीर नसून तो दुसऱ्या कसोटीत खेळले अशी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना आशा आहे.

- Advertisement -

वॉर्नर हा असा खेळाडू जो पूर्णपणे फिट होण्यासाठी सर्वतोपरी करेल. त्याला जेव्हा दुखापत झाली होती, तेव्हापासून आजपर्यंत तो खूप फिट झाला आहे. तो मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी पूर्णपणे फिट होईल अशी मला आशा असल्याचे लँगर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -