घरताज्या घडामोडीOmicron : देशात ओमिक्रॉनच्या पहिल्या रूग्णाला डिस्चार्ज, डोंबिवलीकर वाढदिवशी परतला घरी

Omicron : देशात ओमिक्रॉनच्या पहिल्या रूग्णाला डिस्चार्ज, डोंबिवलीकर वाढदिवशी परतला घरी

Subscribe

महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेला पहिला रूग्ण (Omicron patient in maharashtra) हा covid-19 आरटीपीसीआर चाचणीमध्ये निगेटीव्ह आढळला आहे. या ३४ वर्षीय रुग्णाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. डोंबिवलीकर असलेल्या या रूग्णाने तीन दिवस ओमिक्रॉनवर संसर्गावर उपचार घेतले. महाराष्ट्रातील पहिला तर देशातील चौथा ओमिक्रॉनचा रूग्ण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आढळला होता. पण या रूग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य विभागातील सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला माहिती दिली.

डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक मानल्या जाणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंटवर या रूग्णाने मात केली. डिस्चार्ज मिळतानाच या रूग्णाने कोरोनाच्या या नव्या व्हेरीएंटवर जनजागृती करण्यासाठी मदत करणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे नव्या स्ट्रेनबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचेल असेही त्याने स्पष्ट केले. ओमिक्रॉनची लागण झाल्याचे सुरूवातीला कळाल्यावर हा रूग्ण अतिशय घाबरला होता. पण आता कोरोनावर मात केल्यानंतर आता रूग्णाला आपला अनुभव लोकांशी शेअर करायचा आहे. मी आता ओमिक्रॉनचा झिरो पेशंट झाल्याची प्रतिक्रियाही त्याने दिली. ओमिक्रॉनवर आतापर्यंत खूपच कमी लोकांनी मात दिली आहे. ओमिक्रॉनवर मात केलेल्या रूग्णांपैकी हा डोंबिवलीचाही एक रूग्ण ठरला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा सापडलेला हा रूग्ण आरटीपीसीआर चाचणीनंतर निगेटिव्ह येणारा देशातील पहिला रूग्ण ठरला आहे. नव्या व्हेरीएंटची धास्ती घेतलेल्या लोकांमध्ये या रूग्णाकडून अधिक सकारात्मक माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

- Advertisement -

केपटाऊन ते डोंबिवलीचा प्रवास

देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंटचे पहिले दोन रूग्ण हे कर्नाटकात सापडलेले असतानाच महाराष्ट्रात पहिला रूग्ण हा डोंबिवलीत सापडल्याचे निष्पन्न झाले. हा रूग्ण २४ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून मुंबईला आला होता. त्याच्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७२ तास आधीच्या चाचणीत हा रूग्ण निगेटिव्ह आला होता. त्यानंतरच इंटरकनेक्टेड फ्लाईटने त्याने मुंबई गाठली.

या रूग्णाने केपटाऊन येथे मुंबईसाठीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी RT-PCR चाचणी केली होती. दिल्लीतून त्याने मुंबई गाठली होती. पण त्या चाचणीत SARS-CoV-2 साठी हा रूग्ण निगेटिव्ह आला होता. दिल्ली एअरपोर्टला त्याची चाचणी केल्यानंतर ती चाचणी पॉझिटिव्ह आली. आधीचा अहवाल हा खोटा असल्याची शंकाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही अधिकाऱ्यांना त्यांना मुंबई प्रवासाला जाण्यासाठी मुभा दिली. चाचणीचा अहवाल येईपर्यंतही त्या रूग्णाला थांबविण्यात आले नाही. पण अहवालात कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. डोंबिवलीत येण्याआधी मुंबई एअरपोर्टवरही त्याने निगेटिव्ह रिपोर्ट दाखवला. कोरोनाची लक्षणे ही सौम्य असल्यानेच डोंबिवलीत आल्यानंतर होम क्वारंटाईनचा निर्णय घेतला.

- Advertisement -

पण केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. ४ डिसेंबरला कस्तुरबा गांधी हॉस्पिटलचा जिनोन सिक्वेन्सिंगचा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल समोर आला. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या संपर्कातील १२ हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि २३ लो रिस्क कॉन्टॅक्ट्स हे निगेटिव्ह आढळले. तसेच दिल्ली मुंबई फ्लाईटसे २५ सहप्रवासी देखील कोरोना निगेटिव्ह आढळले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात ओमिक्रॉनची धास्ती ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणात आहे. पण आतापर्यंतच्या ओमिक्रॉनच्या आकडेवारीनुसार हा कोरोना व्हेरीएंट तितकासा संसर्गजन्य आणि धोकादायक म्हणून आढळलेला नाही. कारण ऑक्सिजन किंवा हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या आकडेवारीची मोठी आकडेवारी जागतिक पातळीवर नाही. त्यामुळेच लोकांनी घाबरून जाण्यापेक्षा अधिक प्रमाणात कोरोनाचे प्रोटोकॉल पाळणे आणि कोरोनाविरोधी लसीचे डोस घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


Omicron variant: ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण वेगाने करा, मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -