घरताज्या घडामोडीOmicron variant: ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण वेगाने करा, मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश

Omicron variant: ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण वेगाने करा, मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश

Subscribe

राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढण्यापासून रोखण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण वेगाने करा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती आणि ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रादुर्भावावर आढावा घेण्यात आला. यावेळी ज्यांनी पहिला लसीचा डोस घेतल्यावरुन दुसरा लसीचा डोस घेतला अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नवाब मलिक म्हणाले आहेत की, कोरोनाच्या बाबतीत एकंदरीत कोविडच्या बाबत चर्चा झाली. कोविडची संख्या दिवसाला ७०० रुग्णांची राज्यात नोंद होत आहे. सक्रिया रुग्णांची संख्या ६ हजार झाली असून राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

- Advertisement -

राज्यात ओमिक्रॉनचे पेशंट २२ आहेत. पण या ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावापासून नुकसान कमी करायचे असेल तर लसीकरण वेगाने करावे लागणार आहे. गेल्या आठवड्यापासून लसीकरणाची संख्या वाढली आहे. ज्या जिल्ह्यात ही टक्केवारी कमी आहे त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती केली आहे. त्याचबरोबर दीड कोटी असे आहेत ज्यांनी पहिला डोस घेतल्याचा कालावधी संपल्यानंतरही दुसरा डोस घेतला नाही. ते कॉल सेंटरच्या माध्यमातून त्यांना शोधून लवकर लस देण्यासाठी कार्यक्रम विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

- Advertisement -

राज्यात कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी राज्य सरकारने यशस्वीरीत्या कामगिरी केली आहे. यातच नव्याने समोर आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे.


हेही वाचा :  CDS बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, रावत गंभीर जखमी, ११ मृत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -