घरताज्या घडामोडीअयोध्या निकालानंतर सहकारी न्यायमूर्तींसोबत केला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनर अन् वाईन पार्टी!...

अयोध्या निकालानंतर सहकारी न्यायमूर्तींसोबत केला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनर अन् वाईन पार्टी! – रंजन गोगोई

Subscribe

देशाचे माजी सरन्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी आपल्या आत्मचरित्र ‘जस्टिस फॉर द जज: एन ऑटोबायोग्राफी’ मध्ये राम जन्मभूमी-बाबरी मशिदीबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. ९ नोव्हेंबर २०१९मध्ये राम जन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात एकमताने निर्णय सुनावल्यानंतर रंजन गोगोई यांनी निर्णय सुनावणाऱ्या खंडपीठाच्या इतर न्यायमूर्तींसोबत फाईव्ह स्टार हॉटेल ताज मनासिंहमध्ये डिनर केला होता. तसेच यादरम्यान सर्वांसाठी चांगली वाईन ऑर्डर केली होती, असे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

रंजन गोगोई यांच्या कारकिर्दीमधील अनेक प्रमुख घटनांपैकी एक राम जन्मभूमीचे प्रकरण आहे. त्यांनी याबाबत आत्मचरित्रात लिहिले की, ‘निर्णय सुनावल्यानंतर महासचिव यांनी अशोक चक्रच्या खाली कोर्टनंबर १च्या बाहेर न्यायमूर्तींच्या गॅलरीमध्ये एक फोटो सेशनचे आयोजन केले. मग संध्याकाळी मी सहकारी न्यायमूर्तींना डिनरसाठी ताज मानसिंह हॉटेलमध्ये घेऊन गेलो. आम्ही चायनीज जेवण खाल्ले आणि उपलब्ध असलेल्या सर्वात चांगल्या वाईनची एक बॉटल घेतली.’

- Advertisement -

अयोध्या प्रकरणाचा निकाल तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला होता. ज्यामध्ये रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एसए बोबडे आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नजीर यांचा समावेश होता.

याशिवाय त्यांच्यावर लावलेल्या लैंगिक छळाच्या खटल्याच्या सुनावणीच्या खंडपीठात स्वतः हजर राहण्यावर गोगोई यांनी पुस्तक लोकार्पणाच्या वेळी त्यांनी मानले की, ही त्यांची चूक होती आणि चूक सर्वांकडून होते. दरम्यान सेवानिवृत्तीनंतर राज्यसभा सदस्याचा प्रस्ताव स्वीकारताना ते म्हणाले की, मी कोणत्याही पक्षात नाही, त्यांना राष्ट्रपतींनी उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bipin Rawat Chopper Crash : सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा अपूरी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -