घरदेश-विदेशओमिक्रॉनमुळे भयावह चित्र तयार; देशात दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत कोरोनाचा वेगानं संसर्ग

ओमिक्रॉनमुळे भयावह चित्र तयार; देशात दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत कोरोनाचा वेगानं संसर्ग

Subscribe

हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, रविवारी भारतात 33 हजार 647 नवीन रुग्ण आढळले. हा आकडा 17 सप्टेंबर किंवा 107 दिवसांनंतर एका दिवसात सर्वाधिक आहे. 2 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात कोविडची सरासरी 18 हजार 290 नवीन प्रकरणे दररोज नोंदवली गेली. एचटी डेटानुसार, 12 ऑक्टोबरपासून सात दिवसांची ही सर्वाधिक सरासरी आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’ संसर्गाच्या बाबतीत मागील सर्व अवतारांना मागे टाकत आहे. अलीकडेच समोर आलेल्या काही आकडेवारीवरून या गोष्टी स्पष्ट होत आहेत. मात्र, ओमिक्रॉनमुळे आकडेवारीत वाढ झाल्यानंतरही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचवेळी संसर्ग झाल्यानंतर गंभीर आजारी पडल्याच्या बातम्याही समोर आल्यात.

हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, रविवारी भारतात 33 हजार 647 नवीन रुग्ण आढळले. हा आकडा 17 सप्टेंबर किंवा 107 दिवसांनंतर एका दिवसात सर्वाधिक आहे. 2 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात कोविडची सरासरी 18 हजार 290 नवीन प्रकरणे दररोज नोंदवली गेली. एचटी डेटानुसार, 12 ऑक्टोबरपासून सात दिवसांची ही सर्वाधिक सरासरी आहे.

- Advertisement -

आकडेवारीचा विचार करता गेल्या अडीच महिन्यांतील प्रकरणांचा हा सर्वात वाईट दर आहे. त्याचवेळी ते ज्या वेगाने वाढत आहे, तेही चिंताजनक आहे. 25 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात सात दिवसांची राष्ट्रीय सरासरी 6 हजार 641 होती. या अर्थाने, नवीन संसर्गाचा दर केवळ एका आठवड्यात 175 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 9 एप्रिल 2020 नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे. दुसर्‍या लाटेतही ही आकडेवारी 75 टक्क्यांनी वाढली. अहवालानुसार, कोरोना संसर्गाचा सध्याचा दर असाच राहिला तर सात दिवसांत दैनंदिन रुग्णांची संख्या दुप्पट होऊन 36 हजारांवर जाऊ शकते. रविवारी दिल्लीत 3 हजार 194 नवीन रुग्ण आढळून आलेत आणि सात दिवसांची सरासरी 1538 झाली.

आठवडाभरापूर्वीच्या तुलनेत येथील संख्या 832 टक्क्यांनी वाढली. त्याचप्रमाणे रविवारी मुंबईत 8 हजार 63 नवीन रुग्ण आढळून आल्याने दररोज येणाऱ्या रुग्णांची सरासरी वाढून 3 हजार 994 झाली आहे. येथे 624 टक्के वाढ दिसून आली. भारतातील सध्याचा ट्रेंड दैनंदिन प्रकरणांचा दर मागील लहरींपेक्षा वेगाने वाढत असल्याचे दर्शवतो.
जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे. संघटनेने 19 डिसेंबर रोजी सांगितले की, ओमिक्रॉन डेल्टापेक्षा वेगाने पसरत आहे. डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले, ‘कोविड-19 मधून लसीकरण झालेल्या किंवा बरे झालेल्या लोकांना संसर्ग होण्याची किंवा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -