घरCORONA UPDATEशालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनासाठी वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक

शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनासाठी वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक

Subscribe

शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. या संपूर्ण गोष्टींचा आढावा प्रा. वर्षा गायकवाड आजच्या बैठकीतून घेणार आहे.

राज्यात ओमक्रॉनबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशातच आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात होत आहे. या अनुषंगाने इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड आज सर्व संबंधितांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारकडून देखील आवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. या संपूर्ण गोष्टींचा आढावा प्रा. वर्षा गायकवाड आजच्या बैठकीतून घेणार आहे.

या बैठकीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

अशातच आजपासून देशभरात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्य़ा लसीकरणास सुरुवात होत आहे. यासाठी मुंबईत ९ समर्पित कोविड केंद्रांवर सुरु होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रातून सकाळी ११ वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे ऑनलाईन या कार्यक्रमात सहभागी होतील.


Vaccination for 15-18 age group: उद्यापासून मुंबईत ९ केंद्रावर १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -