घरCORONA UPDATEBihar : पाटणाच्या 'NMCH'मध्ये कोरोनाचा कहर; 84 डॉक्टर पॉझिटिव्ह

Bihar : पाटणाच्या ‘NMCH’मध्ये कोरोनाचा कहर; 84 डॉक्टर पॉझिटिव्ह

Subscribe

गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन डोके वर काढत आहे. दरम्यान, रविवारी बिहारची राजधानी पाटणाच्या एनएमसीएचमध्ये  डॉक्टर कोरोना संक्रमित झाले आहेत. या हॉस्पीटलमधील १९४ डॉक्टरांची RT-PCR टेस्ट केली होती. ज्यामध्ये हॉस्पीटलमधील ८४ डॉक्टर कोरोना संक्रमित झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात हॉस्पीटलमधील डॉक्टरांची संख्या पॉझिटिव्ह आल्यामुळे स्वास्थ विभागामधील वातावरण ढवळले आहे.

याशिवाय रविवारी ८४ डॉक्टर कोरोना संक्रमित झाल्यामुळे स्वास्ठ विभागातील अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर कोरोनाबाधित झाल्यामुळे स्वास्थ विभागाच्या संपूर्ण सिस्टमवर याचे विपरीत परिणाम होतील. या ८४ डॉक्टरांमध्ये पदवी,पदव्युत्तर,कनिष्ठ डॉक्टर,वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे.आता २०० डॉक्टरांची RT-PCR तपासणी केली जाणार आहे. जेणेकरुन कोणाला संसर्ग झाला आहे हे कळणार आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉननंतर ‘फ्लोरोना’ची जगभरात धास्ती

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट घोंघावत असतानाच आता फ्लोरोना या नव्या आजाराने शिरकाव केला आहे. ‘फ्लोरोना’ हा कोरोना आणि इन्फ्लूएन्झा यांचा दुहेरी संसर्ग आहे. मात्र या आजाराबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. इस्त्राइल देशात या व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आहे. इस्त्राइलमध्ये एका गर्भवती महिलेला या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे.

फ्लोरोना’ हा कोरोना आणि इन्फ्लूएन्झा यांचा दुहेरी संसर्ग आहे. त्यामुळे हा कोणता नवीन प्रकार किंवा आजार नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी फ्लू आणि कोरोनाची लागण होते तेव्हा असे होते. यात प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांवर एकाच वेळी या दोन विषाणूंचा हल्ला होतो. ज्यामुळे हा संसर्ग कोरोना संसर्गपेक्षा दुप्पट धोकादायक ठरत आहे. मात्र इस्त्रायली शास्त्रज्ञ अजून तपशील काढण्यासाठी ‘फ्लोरोना’च्या नमुन्याचा अभ्यास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात केवळ इलेक्ट्रिक वाहनांचीच खरेदी करणार; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -