घरदेश-विदेशआमचे बेबी प्रॉडक्ट हानिकारक नाहीत; जॉन्सन अँड जॉन्सनने फेटाळले आरोप

आमचे बेबी प्रॉडक्ट हानिकारक नाहीत; जॉन्सन अँड जॉन्सनने फेटाळले आरोप

Subscribe

जॉन्सन अँड जॉन्सनने सरकारी विश्लेषकांनी दिलेला हंगामी निकाल अमान्य केले, कारण ते अज्ञात आणि अस्पष्ट पद्धतींवर आधारित असून या अंतरिम चाचणी निकालांवर आक्षेप घेतला आहे. आम्ही केंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या पुनर्चाचणी प्रक्रियेचा निकाल आणि निष्कर्षांची प्रतीक्षा करू. आम्हाला राष्ट्रीय बाल अधिकार सरंक्षण आयोग (एनसीपीसीआर) च्या सूचनांची कोणतीही कल्पना नाही. कायद्याअंतर्गत अशा प्रकारची कोणतीही सूचना विशिष्ट निर्धारित परिस्थितीअंतर्गत वितरित केली जाते.

जॉन्सन अँड जॉन्सन आमच्या सर्व उत्पादनांची निर्मिती आणि चाचणीसाठी सध्याच्या भारतीय नियामक सूचना आणि मापदंडाचे पूर्णपणे पालन करत आहे. आम्ही भारतीय विश्लेषक अधिकाऱ्यांना खात्री दिली आहे की आम्ही आमच्या शॅम्पूमध्ये तीव्र जंतूनाशके (फॉर्मल्डेहायड) वापरत नाही आणि जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्येही तीव्र जंतूनाशके (फॉर्मल्डेहायड) तयार होतील अशा प्रकारचे कोणतेही घटक समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. आमची उत्पादने वापरासाठी सुरक्षित आहेत आणि डी अँड सी कायदा तसेच डी अँड सी नियमांअतर्गंत सर्व मापदंडाशी सुसंगत आहोत याची खात्री देतो.

- Advertisement -

जॉन्सन अँड जॉन्सनने स्पष्ट केले, की आमची उत्पादने सुरक्षित आहेत आणि आमची आश्वासक प्रक्रिया जगातील सर्व कठोर प्रक्रियांपैकी एक असून ज्या देशांत आमची उत्पादने विकली जातात त्या प्रत्येक ठिकाणचे सुरक्षाविषयक मापदंडाचे पालन करणे आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे भारतातील बाजारपेठ आमच्यासाठी महत्वाची असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -