घरदेश-विदेशविमानात तडफडत राहिला पण भारतीय असल्याने पाकिस्तानने मदत करण्यास दिला नकार

विमानात तडफडत राहिला पण भारतीय असल्याने पाकिस्तानने मदत करण्यास दिला नकार

Subscribe

विमान प्रवासा दरम्यान अचानक तब्बेत खराब झालेल्या भारतीयाला उपचार करण्यास पाकिस्तानने नकार दिला. भारतीय असल्याने पाकिस्तानने उपचार न करण्याचे कारण दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा अमानविय चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

पाकिस्तानचा अमानवीय चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. तुर्कीवरुन दिल्लीला विमानातून प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाची अचानक तब्बेत खराब झाली. त्यामुळे पायलटने लाहौर एअरपोर्टवर एमर्जन्सी लॅडिंग केले. मात्र लॅडिंगनंतर पाकिस्तानने ही व्यक्ती भारतीय असल्याने उपचार करण्यास नकार दिला.

- Advertisement -

भारतीय असल्याने उपचाराला नकार

राजस्थानच्या भिवाडी शहरामध्ये राहणारे विपिन विमानाने तुर्कीवरुन भारतात येत होते. मात्र प्रवासा दरम्यान त्यांची तब्बेत अचानक खूप खराब झाली. त्यांची तब्बेत पाहून पायलटने एमर्जन्सि लँडिंगचा निर्णय घेतला. विमानाचे लँडिंग झाले. विपीन तडफडत राहिला मात्र पाकिस्तानने विपिनवर उपचार करण्यास नकार दिला. विपिन भारतीय असल्याचे कारण सांगत पाकिस्तानने उपचार करण्यास नकार दिला. सध्या विपिनवर गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

३ तास विपिन तडफडत होता

विपिन तीन तास लाहौरमध्ये तुर्कीच्या विमानात तडफडत राहिला. त्यानंतर तुर्की एअरलाईन्स परत दिल्ली एअरपोर्टवर पोहचली. त्यानंतर विपिनला गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. विपीनची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. विपिनसोबत प्रवास करणाऱ्या जालंधरमध्ये राहणाऱ्या पंकज मेहता यांनी हा सर्व प्रसंग सांगितला. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाला ट्विटर केले. विपिन एका विमा कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते तीन दिवसासाठी तुर्कीला जात होते.

- Advertisement -

प्रवासा दरम्यान अचानक तब्बेत बिघडली

१२ ऑगस्टला संध्याकाळी विपिन इस्तांबुल एअरपोर्टवरुन दिल्लीला येत होते. रात्री १० वाजता विपिनने वाइन प्यायली. त्यानंतर त्यांची तब्बेत अचानक खराब होऊ लागली. रात्री एक वाजता त्यांना चक्कर आली. त्यांनी क्रू मेबरकडे मदत मागितली. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका भारतीय डॉक्टरने त्यांना संभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र विपिनची प्रकृती आणखी खराब झाल्याने पायलटने रात्री दीड वाजता लाहौर एअरपोर्टवर लँडिंग केले. मात्र पाकिस्तानने त्यांना उपचार देण्यास नकार दिला. जवळपास तीन तासानंतर विमान दिल्लीकडे रवाना झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -