घरदेश-विदेशPakistan Election 2024: पाकिस्तानी लोकांनाही आवडत नाहीत दहशतवादी; निवडणुकीत 'हाफिज सईद'च्या मुलाला...

Pakistan Election 2024: पाकिस्तानी लोकांनाही आवडत नाहीत दहशतवादी; निवडणुकीत ‘हाफिज सईद’च्या मुलाला दाखवली लायकी

Subscribe

दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद एनए-122 (लाहोर) मतदारसंघातून निवडणूक हरला आहे

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या निवडणूक निकालात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे नेते नवाझ शरीफ यांनी सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे. नवाज यांची मुलगी मरियम नवाज आणि भाऊ शाहबाज शरीफ यांनीही निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद एनए-122 (लाहोर) मतदारसंघातून निवडणूक हरला आहे. (Pakistan Election 2024 Pakistanis don t like terrorists either Hafiz Saeed s son showed merit in the election)

या जागेवर PTI-समर्थित उमेदवार लतीफ खोसा यांनी NA 122 जागा जिंकली आहे, त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ख्वाजा साद रफिक यांचा 1,17,109 मतांनी पराभव केला आहे.

- Advertisement -

दहशतवादी हाफिज सईदचा पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लीम लीग (PMML) ने निवडणूक लढवली होती. देशभरातील प्रत्येक राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही.

हाफिजच्या नातेवाईकांनीही निवडणूक लढवली!

हाफिजने त्याचा मुलगा तल्हा सईद याला उमेदवार केले होते. या संघटनेने पाकिस्तानातील विविध शहरांतून नामनिर्देशित केलेले काही उमेदवार एकतर हाफिज सईदचे नातेवाईक होते किंवा ते पूर्वी प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबा, जमात-उद-दावा किंवा मिल्ली मुस्लिम लीगशी संबंधित होते. हाफिजशी संबंधित संघटनेने पाकिस्तानातील जनतेची दिशाभूल करण्याचा राजकीय अजेंडाही पुढे आणला होता. त्यांचा पक्ष निवडणुकीत इस्लामिक स्टेटचे स्वप्न दाखवत होता. तथापि, लोकांनी त्यांच्या दाव्यांवर अविश्वास दाखवल्याचंच दिसून येत आहे.

- Advertisement -

हाफिज मोहम्मद सईद हा मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह 166 लोक मारले गेले. अमेरिकेनेही त्याच्या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. अमेरिकेने त्याच्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. सध्या, लष्कर-ए-तैयबा (LeT) संस्थापक हाफिज मोहम्मद सईद 2019 पासून बंदी घातलेल्या जमात-उद-दावा (JuD) च्या इतर काही नेत्यांसह तुरुंगात आहे. त्याला दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. सईदच्या नेतृत्वाखालील JuD ही लष्कर-ए-तैयबा (LeT) ची आघाडीची संघटना आहे, जी 2008 च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार आहे.

इम्रान समर्थकांनी 10 जागा जिंकल्या

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 24 जागांचे निकाल आले आहेत. इम्रान यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्षांनी 10 जागा जिंकल्या आहेत. पीएमएल दुसऱ्या क्रमांकावर आहे. नवाझ शरीफ यांच्या पक्षाने 8 तर बिलावत यांच्या पक्षाने 5 जागा जिंकल्या आहेत.

पाकिस्तानच्या निवडणुकीच्या निकालात हेराफेरीचा संशय व्यक्त केला जात होता. मतमोजणी होऊनही निकाल जाहीर होत नसल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे. कारण इम्रानने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला मोठा विजय मिळत आहे.

पाकिस्तानमध्ये एकूण 342 जागा आहेत. मात्र, 265 जागांवर निवडणूक होत असून बहुमतासाठी 133 जागांची आवश्यकता असेल. पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात पीटीआयच्या उमेदवारांचे वर्चस्व आहे. सिंध प्रांतात पीपीपीचा प्रभाव आहे. तर बलुचिस्तानमध्ये संमिश्र परिणाम दिसत आहेत.

2018 च्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआयने 149 जागा जिंकल्या होत्या. नवाझ शरीफ यांच्या पक्ष पीएमएल (एन) ने 82 जागा जिंकल्या होत्या. बिलावत भुट्टो यांच्या पीपीपीला 54 जागा मिळाल्या. 47 जागा इतर पक्षांनी काबीज केल्या.

पाकिस्तानमध्ये सध्या गृहयुद्धाची शक्यता आहे. नवाझ शरीफ देश सोडून जाण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. इम्रान समर्थक रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

(हेही वाचा: Dahisar Firing : घोसाळकर गोळीबार प्रकरण; विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी  )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -