घरमनोरंजनकाय सांगतोय 'हिरामंडी' चा First Look...

काय सांगतोय ‘हिरामंडी’ चा First Look…

Subscribe

बराच काळापासून चर्चेत असलेली हिरामंडी ही एक वेबसिरीज आहे. जी आपण नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत. जेव्हा पासून हिरामंडीचा पोस्टर आऊट झाला तेव्हापासून त्याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं.

संजय लीला भन्साळींची कलाकृती म्हटलं की, पडद्यावर तुम्हाला ग्रेस, ग्लॅमरसोबत लार्जर दॅन लाईफ अनुभूती मिळायलाच हवी. आजपर्यंतच्या त्यांच्या अनेक चित्रपटांतून ती भवदिव्यता आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. मग तो ‘हम दिल दे चुके सनम’ असो, ‘ब्लॅक’ असो, ‘पद्मावत’ असो किंवा ‘बाजीराव मस्तानी’ ! संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा तीच सौंदयानुभूती घेऊन येत आहेत, त्यांच्या ‘हिरामंडी’ मधून…!

बराच काळापासून चर्चेत असलेली हिरामंडी ही एक वेबसिरीज आहे. जी आपण नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत. जेव्हा पासून हिरामंडीचा पोस्टर आऊट झाला तेव्हापासून त्याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं. सोशल मिडियावर आजपर्यंत फक्त ऐकिवातच असलेल्या लाहोरमधल्या हिरामंडीच्या माहितीचे व्हिडीओ बनू लागले. ही हिरामंडी लाहोरमध्ये नक्की आहे कुठे?… त्याचा इतिहास काय?… आता हिरामंडी दिसते कशी ?… वगैरे वगैरे माहितीचा सडाच सोशलमिडीयावर पडला !!!

असो पण संजय लीला भन्साळींची ‘हिरामंडी’ लाहोरच्या एका कोठ्यावर घडणारी गोष्ट आहे. ज्यात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचेही संदर्भ जोडले गेले आहेत. मनीषा कोईराला, रिचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, संजिदा शेख, मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या मल्टी स्टारर वेब सीरिजचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यातली भन्साळीची छाप असलेली तीच सुंदर सिनेमॅटोग्राफी, भव्यदिव्य सेट्सची रेलचेल निश्चितच प्रेक्षकांना आकर्षित करणारी आहे. त्यामुळे संजय लीला भन्साळींची ही कलाकृती नजर खिळवून ठेवेल यात काही शंकाच नाही. पण फर्स्ट लूक आला असला तरी वेब सिरीजच्या प्रदर्शित होण्याची तारीख मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

त्यावेळच्या लाहोरमधील कोठ्यातली जीवनशैली कशी होती याचा अंदाज आपल्याला या फर्स्ट लूकमधून कळतो. एक असाही जमाना होता जेंव्हा तवायफांच्या या कोठ्यावर सुकून होता, शांती होती. त्यांच्या हसत्या- खेळत्या जीवनशैलीत कलेचा अविष्कार होता. अशातच त्या काळात स्वातंत्र्य संग्रामचं बिगूल वाजू लागतं. हळूहळू लोकांच्या मनातील स्वातंत्र्य संग्रामाची आग पसरू लागते आणि त्याचा लोट या कोठ्यावर पण येऊन पोचतो. आणि मग या कोठ्यात राहणाऱ्या लोकांना कश्याप्रकारे बदलांना सामोरं जावं लागतं. यासोबतच या फर्स्ट लूकमध्ये आपल्याला आणखीही काही गोष्टींचे संकेत मिळताहेत त्यानुसार तुम्हाला शह-काटशह , कुटील कारस्थानं, षडयंत्र पाहायला मिळेल. त्यातून घडणारे दगलबाजीचे किस्से पाहायला मिळतील. आणि या सगळ्या सोबतच आर्ट आणि ग्लॅमरची सौंदर्यानुभूती हा संजय लीला भन्साळींचा मुख्य यूएसपी आहेच. त्यामुळे प्रेक्षकांची हिरामंडी बद्दलची उत्कंठा निश्चितच शिगेला पोचली आहे !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -