घरक्राइमDahisar Firing : घोसाळकर गोळीबार प्रकरण; विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी

Dahisar Firing : घोसाळकर गोळीबार प्रकरण; विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी

Subscribe

मुंबईतील दहिसर भागात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा यांनी एक नव्हे तर तब्बल पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर आज 9 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील दहिसर भागात मॉरिस नोरोन्हा याने ठाकरे गटातील माजी नगरसेवक यांच्यावर केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वरुन सरकारवर निशाणा साधला आहे. (Dahisar Firing Morris Ghosalkar firing case Incumbent on the target of the opposition)

मुंबईतील दहिसर भागात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा यांनी एक नव्हे तर तब्बल पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर आज 9 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

- Advertisement -

माध्यमांना प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार मीडिया प्रतिधीनींना उद्देशून म्हणाले की, उद्या तू आणि मी एकत्र बसून बोलायचं ठरवलं आणि गोळीबार झाला तर? असा प्रश्न विचारला. यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गाडीखाली कुत्रं लं तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया ट्वीट कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Bharat Ratna : चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासह डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न

मुख्यमंत्री अजूनही मौनात!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, गोळीबारात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दोघांच्या संवेदना व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया समोर आल्या. तरीही मुख्यमंत्री अजूनही मौनात अशा सूचक शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : Dahisar Firing: मॉरिस म्हणायचा, ”मी अभिषेकला सोडणार नाही”; मॉरिसच्या बायकोचा पोलिसांना जबाब

खासदार सुप्रिया सुळेंनी साधला सरकारवर निशाणा

राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्टमध्ये लिहिले की, मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची सोशल मीडियावर लाइव्ह असताना गोळीबार करुन हत्या करण्यात आली. नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून, त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे ‘गुंडाराज’ सुरू झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खून घडत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री यांचे त्यांच्या स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी? असा थेट सवाल सुळे यांनी विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -