घरदेश-विदेशकाश्मीरात धुमश्चक्री

काश्मीरात धुमश्चक्री

Subscribe

भारतीय सैनिकांकडून पाकिस्तानी चौकी उद्ध्वस्त

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सीमा भागात सुरू असलेल्या कुरापतींना सडेतोड उत्तर देताना भारतीय सैनिकांनी शनिवारी पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त केली. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. त्यानंतर सातत्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. भारतीय सीमेत गोळीबार करणार्‍या पाकिस्तानच्या तीन सैनिकांचा भारतीय जवानांनी दोन दिवसांपूर्वी खात्मा केला होता.

शनिवारी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान, पाककडून सकाळी साडेसहाच्या सुमारास शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. भारताने जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम केल्यामुळे पाकिस्तानवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून पाकिस्तान सतत भारताविरोधात कारवाया आणि वक्तव्ये करत आहे. तसेच पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अंदाधुंद गोळीबार करत आहे. शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्ताने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रयुत्तर दिले. भारतीय सैनिक पाकिस्तानला प्रयुत्तर देत असताना लान्स नाईक संदीप थापा शहीद झाले.

- Advertisement -

टेलिफोन, इंटरनेट सेवा पूर्वपदावर
जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक आणि कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र गेल्या २-३ दिवसांपासून काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खोर्‍यातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर आता जम्मूमध्ये ‘२ जी’ इंटरनेट तर, काश्मीरमध्ये टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बी. आर. सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन खोर्‍यातील परिस्थितीची माहिती दिली होती.

जम्मू काश्मीरमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-कॉलेजे आणि सरकारी कार्यालये येत्या १९ ऑगस्ट, सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कार्यालये, सचिवालय शुक्रवारपासून कामकाजाला सुरुवात करणार आहेत. तसेच जम्मू-काश्मीरच्या उधमपूर, रियासी, कठुआ, सांबा आणि जम्मू शहरात ‘२ जी’ इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. अन्य निर्बंधदेखील उठवण्यात आले आहेत. काश्मीरमध्ये मात्र, तूर्त केवळ फोनसेवा सुरू करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे. तसेच, अटकेत असलेल्या नेत्यांनाही त्यानंतरच सोडले जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -