घरदेश-विदेशकोरोना लसीसाठी पाकिस्तान भारताच्या प्रतिक्षेत?

कोरोना लसीसाठी पाकिस्तान भारताच्या प्रतिक्षेत?

Subscribe

पाकिस्तानने चीनकडून १० लाख साइनोफार्म लसीची केली मागणी

भारतात कोरोना प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहिमेला मोठ्य़ाप्रमाणात सुरु आहे. भारतात दर दिवशी १ लाखहून अधिक नागरिकांना ही लस दिली जात आहे. त्यातच भारताने इतर मित्र राष्ट्रांनाही मदतीचा हात देत लसीचे साठा पुरवला आहे. त्यातच आता पाकिस्ताननेही भारतात तयार होणाऱ्या ‘कोविशिल्ड’ लसीची मागणी केल्याचे वृत्त आहे. इमरान खान सरकारने ‘कोविशिल्ड’ लसीचा समावेश अत्यावश्यक यादीत करण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता कोविशिल्डच्या वापरासाठी परवानगी असणार आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताकडून कोविशिल्ड लस मागू शकतो. परंतु भारताकडून मदतीसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

भारताने शेजारील सहा राष्ट्रांना कोरोना लस पुरवण्याची मोहिम सुरु केली आहे. भूतान, मालदीव्हज, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्सला भारत लस निर्यात करणार आहे. सध्या भारताचा विचार केला असता ३३५१ ठिकाणी लसीकरण मोहिम सुरु आहे. या मोहिमेत आता जागतिक संघटनेने भाग घेत सर्व देशांना लस मिळावी यासाठी कोवॅक्स योजना केली आहे. यामाध्यमातून पाकिस्तानलाही कोविशिल्ड लस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु शत्रू पाकिस्तानकडून भारताविरोधात सुरु असलेल्या कुरघोड्या पाहता भारत पाकिस्तानला लस देईल का हा प्रश्न आहे. पाकिस्तानने चीनकडून १० लाख ‘सिनोफार्म’ लसीची मागणी केली आहे. चीनच्या लस देउन व त्यासाठी कर्ज काढायला लावून गरजू देशांना आपल्या सापळ्यात अडकवण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा दावाही काही माध्यमांनी केला आहे. त्यात अर्थातच पाकिस्तानच्या नावाचाही समावेश आहे. पाकिस्तान अगोदरच चीनच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे चीनकडून लस घेत अजून दबावाखाली राहयचे की मग भारताकडून परवडणाऱ्या लसीची मागणी करायची असे दोन पर्याय सध्या पाकिस्तानसमोर आहेत. परंतु पाकिस्तानने भारतासोबत केलेले शत्रूत्व तणावाचे संबंध पाहता भारत पाकिस्तानला स्वप्नातसुद्धा भारत लस देणार नाही.


हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदे?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -