घरदेश-विदेशख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

Subscribe

जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते.

भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

जसराज हे मेवाती घराण्यातील शास्त्रीय गायकांपैकी एक असलेले भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. पंडित जसराज यांचा जन्म २४ जानेवारी १९३० रोजी झाला असून जसराज हे जेव्हा चार वर्षांचे होते त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडित मोतीराम यांचं निधन झालं. त्यानंतर मोठा भाऊ पंडित मनीराम यांनीच जसराज यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानाचे मोठे केले होते.

पंडित जसराज यांचे काम मोठे असल्याने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असे नावही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार

  • पद्मश्री – १९७५
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार – १९८७
  • पद्म भूषण – १९९०
  • पद्म विभूषण – २०००
  • पु.ल. देशपांडे जीवनगौरव पुरस्कार – २०१२
  • भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार – २०१३
  • गंगुबाई हनगल जीवनगौरव पुरस्कार – २०१६

दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -