घरताज्या घडामोडीपाठकबाई आणि राणा दाचा लाडू सोडतोय श्रावणी सोमवारचा उपवास

पाठकबाई आणि राणा दाचा लाडू सोडतोय श्रावणी सोमवारचा उपवास

Subscribe

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई आणि राणा दा यांचा लाडका लाडू यांनी देखील श्रावणी सोमवार पकडला असून तो हा उपवास सोडताना दिसत आहे.

श्रावण महिना सुरू झाला की अनेक व्रतवैकल्यांनाही सुरूवात होते. श्रावणात केलेले उपवास हे फळाला लागतात अशी धारणा आहे. आपल्या देवी – देवतांची कवाडे या महिन्यात खुली असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, या भावनेतून श्रावणामध्ये ही व्रतवैकल्ये केली जातात. त्यामुळे श्रावणी सोमवार, शनिवारी उपवास केले जातात.

- Advertisement -

विशेष म्हणजे हे उपवास लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण करतात. असाच उपवास तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई आणि राणा दा यांचा लाडका लाडू यांनी देखील श्रावणी सोमवार पकडल्याचे दिसून येत आहे. लाडूने आज शेवटचा श्रावणी सोमवारचा उपवास सोडतोय की फक्त फोटोला कॅप्शन दिलीय, हे त्यालाच ठाऊक. पण, खरंचहा खूप गोड फोटो त्याने शेअर केला आहे.

- Advertisement -

बालकलाकार राजवीर ऊर्फ लाडूच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. तो नेहमीच सण-उत्सवा दरम्यान सोशल मीडियावर आपले नाना-विविध फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो.


हेही वाचा – Photo: मलायका ट्रेडिशनल लूकमुळे आली चर्चेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -