घरदेश-विदेशपतंजलीच्या उत्पादन विक्रीमध्ये घट

पतंजलीच्या उत्पादन विक्रीमध्ये घट

Subscribe

पतंजलीच्या उत्पादन विक्रीमध्ये पाच वर्षामध्ये घट झाली आहे.

पतंजली, अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरलेला ब्रँड. पाच वर्षापूर्वी उत्पादन सुरू केलेल्या पतंजलीनं चांगलंच मार्केट काबीज केलं. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांची, ब्रँडची झोप उडाली. पण, आता बाबा रामदेव यांच्या पतंजलीला मोठा धक्का बसला आहे. पाच वर्षामध्ये पतंजलीच्या उत्पादन विक्रीमध्ये घट झाल्याची बाब आता समोर आली आहे. जीएसटी आणि कमकुवत वितरण व्यवस्थेमुळं कंपनीच्या उत्पादनाची विक्री कमी झाल्याची बाब आता समोर आली आहे. केअर रेटिंगनं याबाबतचा अहवाल दिला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पतंजलीला वस्तुंच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात १० टक्क्यांपेक्षा देखील जास्त घट झाली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात महसूल ८१४८ कोटींपर्यंत खाली घसरला. आगामी ३ ते ४ वर्षामध्ये कंपनीची उलाढाल ही २० हजार कोटींवर नेण्याचा रामदेव बाबा यांचा प्रयत्न होता.

आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करत पतंजलीनं ग्राहकांच्या मनावर राज्य केलं. लोकांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जनरल स्टोअरमध्ये उत्पादनं गेल्यामुळे त्यांची लोकप्रियता घटली. ग्राहक त्यांच्याकडे इतर उत्पादनांप्रमाणे पाहू लागला. त्याचा फटका पतंजलीला बसल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -