सुटलेलं विमान पकडण्यासाठी ‘ती’ धावली; Video व्हायरल

विमान पकडण्यासाठी थेट रनवेवर धाव घेणाऱ्या या महिलेचं नाव हॅना असं आहे. हॅना इंडोनेशियाहून जकार्ताला निघाली होती.

आपली रोजची बस किंवा ट्रेन चुकू नये यासाठी जीव मुठीत घेऊन धावणार लोक तुम्ही पाहिलेच असतील. मात्र, कधी कुणी धावत जाऊन विमान पकडल्याचं ऐकलयंत का? विमान सुटलं म्हणून ते पकडण्यासाठी चक्क एक महिला रनवेवर धावत गेली. हा अजब प्रकार इंडोनेशियाच्या एका एअरपोर्टवर घडला असून, सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. विमान सुटलं एक महिला प्रवासी चक्क धावपट्टीवर गेली आणि विमानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं धावपट्टीवर असलेल्या काही सुरक्षा रक्षकांनी या महिलेला रोखलं, त्यामुळे पुढे जाऊन काही अनर्थ झाला नाही. या सगळ्या घटनेचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून, लोक त्या प्रवाशी महिलेवर जोरदार टीका करत आहेत. तर, दुसरीकडे काही लोक या महिलेची खिल्ली उडवत आहेत. विमान पकडण्यासाठी महिलेने केलेला हा स्टंट मूर्खपणा असल्याचं काहीजणांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर अनेकांनी हा खरोखरंच एक स्टंट असल्याचंही सोशल मीडियावर म्हटलंय. मात्र, काहीही असलं तरी एखाद्या चित्रपटातला वाटावा असा प्रसंग प्रत्यक्षात घडल्यामुळे नेटिझन्स या व्हिडिओला तितकीच पसंतीही देत आहेत.

 


घटना सविस्तर… 

उपलब्ध माहितीनुसार, विमान पकडण्यासाठी थेट रनवेवर धाव घेणाऱ्या या महिलेचं नाव हॅना असं आहे. हॅना इंडोनेशियाहून जकार्ताला निघाली होती. साहाजिकच तिला विमान पकडायला उशीर झाल्यामुळे एअरपोर्टवर तिच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, ३ वेळा फायनल कॉल देऊनही हॅनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विमानाचा दरवाजा बंद झाला आणि विमान टेक-ऑफसाठी धावपट्टीवर गेलं. अचानक विमान सुटण्याच्या १० मिनीटं आधी हॅना सुरक्षारक्षकांना चकवा देऊन विमान पकडण्यासाठी धावपट्टीच्या दिशेने धावत सुटली. महिला रनवेवर येताच सुरक्षा रक्षकांनी तातडीने जाऊन तिला अडवले आणि तिथून सुरक्षित ठिकाणी नेले. काही प्रवाशांनी यावेळी सदर घटनेचा व्हिडिओ शूट केला आणि इंटरनेटवर व्हायरल केला.