घरदेश-विदेशगुजरातमध्ये तथाकथित सवर्णांनी दलितांची वरात अडवली

गुजरातमध्ये तथाकथित सवर्णांनी दलितांची वरात अडवली

Subscribe

गुजरात राज्यात पुन्हा एकदा जातीय तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसले. रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दलित समाजाच्या लग्नात बाधा आणल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पहिल्या प्रकरणात अरवल्ली जिल्ह्यात एका दलित कुटुंबाचे लग्न होणार होते. यावेळी नवरा मुलगा वरात घेऊन आला होता. मात्र पाटिदार समाजाच्या काही लोकांनी रस्ता अडवून ठेवला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाटीदार समाजाने भजन आणि यज्ञ सुरु केल्यामुळे वरात लग्नस्थळी पोहचू शकली नाही.

अरवल्ली जिल्ह्यातील घटनेत दलित आणि पाटिदार समाजामध्ये तणाव टोकाला गेला होता. पाटिदार समाजाने जवळपास पाच तास ही वरात रोखून धरली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये काही वऱ्हाडी आणि पोलीस देखील जखमी झाले आहेत. गांधीनगर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी मयांक छावडा म्हणाले की, “आम्ही नवऱ्याकडील मंडळीला आता पुर्ण सुरक्षाव्यवस्था पुरवू. सोमवारी पुन्हा एकदा वरात निघेल. तसेच दोन्ही समाजातील प्रमुख व्यक्तींना एकत्र बसवून वादाचा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”

- Advertisement -

मात्र दुसऱ्या बाजुला नवऱ्याकडील मंडळींनी पोलिसांवरच उलट आरोप केलेला आहे. पोलिसांनी आम्हाला सरंक्षण पुरवले नाही आणि पाटिदार समाजाने आमची वरात अडवून ठेवली होती. आता सोमवारी तरी पोलीस आम्हाला सुरक्षा पुरवतील म्हणजे लग्न सुरळीत पार पडू शकेल, अशी अपेक्षा नवऱ्याकडील मंडळींनी व्यक्त केली आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात साबरकांठा जिल्ह्यात एका दलित नवरदेवाला गावातील मंदिरात दर्शन घेण्यापासून रोखले गेले. नवऱ्याकडील मंडळींनी पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात नवऱ्याला मंदिरातील देवाचे दर्शन आणि वरात घेऊन पुढे जाता आले. साबरकांठाच्या सितवाडा गावातील ठाकोर समाजाने दलित कुटुंबियांच्या वरात आणि देवदर्शनाला विरोध केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -