घरदेश-विदेश'INDIA' विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका, आज होणार सुनावणी

‘INDIA’ विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका, आज होणार सुनावणी

Subscribe

विरोधकांच्या 'INDIA' या नावाविरोधात एक जनहित याचिका गिरीश भारद्वाज नामक व्यक्तीकडून आपल्या वकिलाच्यामार्फत दाखल केलेली आहे. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील NDAला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी आघाडीची मोट बांधलेली आहे. विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘INDIA’ म्हणजेच “इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लुझिव अलायन्स” हे नाव दिलेले आहे. या नावाला सत्ताधाऱ्यांकडून विरोध करण्यात आला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी इंडियाचा अर्थ हा इंडियन मुजाहिद्दीन असा काढला. त्यानंतर एकच गदारोळ पाहायला मिळत आहे. सत्ताधारी काहीही म्हणत असले तरी विरोधक मात्र आपल्या या आघाडीला ‘इंडिया’ हे नाव दिल्यानंतर आणखी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. परंतु आता या नावाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. विरोधकांना त्यांच्या आघाडीसाठी इंडिया हे नाव वापरण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या याचिकेवर आज (ता. 04 ऑगस्ट) सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Petition in Delhi High Court against ‘INDIA’)

हेही वाचा – Make In India साठी सरकारचा मोठा निर्णय; लॅपटॉप-टॅबलेट आयातीवर लावले निर्बंध

- Advertisement -

गिरीश भारद्वाज या कार्यकर्त्याने त्यांचे वकील वैभव सिंह यांच्यामार्फत ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर ही याचिका आज मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संजू नरूला यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आलेली आहे. ज्यामुळे आज या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. गिरीश भारद्वाज यांनी आपल्या याचिकेमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विधानांचा हवाला देत म्हटले आहे की, या नेत्यांनी त्यांच्या आघाडीचे नाव आपल्या राष्ट्राचे नाव म्हणून प्रस्तुत केले आहे आणि एनडीए किंवा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याच राष्ट्रासोबत संघर्षात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

याचिकाकर्ते गिरीश भारजद्वाज यांनी आपल्या याचिकेत लिहिले आहे की, राहुल गांधींच्या विधानामुळे सामान्य लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, आगामी निवडणुका राष्ट्रीय आघाडी (NDA) आणि ‘देश’ म्हणजेच इंडिया यांच्यातच लढल्या जातील. तसेच, यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) तक्रार देखील केली होती, परंतु निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. ज्यामुळे हे नाव वापरण्यावर त्यांना बंदी घालण्यात यावी, असे भारद्वाज यांच्याकडून नमूद करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली होती. त्यावेळी या बैठकीला 15 विरोधी पक्षांचे सहभागी झाले होते. त्यानंतर 17 आणि 18 जुलैला बंगळुरूमध्ये विरोधकांची आणखी एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एकून 26 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. या दोन दिवसीय बैठकीनंतर विरोधकांनी पत्रकाप परिषद घेवून विरोधकांच्या आघाडीला यापुढे ‘INDIA’ नावाने संबोधले जाणार अशी घोषणा केली. 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरुद्ध एकत्र लढवणार असल्याचे यावेळी विरोधकांच्या आघाडीकडून सांगण्यात आले. आता विरोधकांची पुढील बैठक ही मुंबईत होणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -