घरक्रीडाIND Vs WI T20 : पहिल्याच टी20 सामन्यात भारताला वेस्ट इंडिजने धूळ...

IND Vs WI T20 : पहिल्याच टी20 सामन्यात भारताला वेस्ट इंडिजने धूळ चारली

Subscribe

केवळ 150 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या नाकीनऊ आल्याने त्यांना पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात पराभूत व्हावे लागले आहे. भारताला 4 धावांनी पराभूत विंडीजच्या संघाने पराभूत केले.

त्रिनिदाद : INDIA VS WEST INDIES मधील टी-20 सामन्याला सुरुवात झाली आहे. या दोन्ही संघामध्ये पाच सामने खळवले जाणार असून यांतील पहिला सामना काल गुरुवारी (ता. 03 ऑगस्ट) खेळला गेला. हा सामना सहज भारतीय संघ जिंकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. परंतु केवळ 150 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या नाकीनऊ आल्याने त्यांना पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. काल झालेला पहिला सामना हा त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताला 4 धावांनी पराभूत व्हावे लागले. (West Indies thrashed India in the first T20 match)

हेही वाचा – Asia Cup 2023 : ‘हा’ खेळाडू नाही खेळला तर विश्वचषक गमावू; मोहम्मद कैफचे मोठे विधान

- Advertisement -

गुरुवारी वेस्ट इंडिजने संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाती करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विंडीजच्या संघाने 20 षटकांमध्ये 149 केल्या. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत विंडीजची धाव संख्या कमी होण्यासाठी 6 खेळाडूंना बाद केले. पण त्यानंतर मात्र जेव्हा भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा मात्र, भारतीय खेळाडूंची चांगलीच धांदळ उडाली. त्यामुळे कालच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंना त्यांचा अतिआत्मविश्वास नडल्याचे सांगण्यात येत आहे.

सामना सुरू झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या दोन षटकांत संघाला चांगली कामगिरी करता आली नाही, ज्यामुळे या भारताची सुरुवातच खराब झाली. त्यानंतर तिसऱ्या षटकांत शुभमन गिल हा केवळ तीन धावा करून बाद झाला. गिलनंतर भारताचा धडाकेबाज खेळाडू सूर्यकुमार यादल हा फलंदाजीसाठी मैदानात आला. सुर्याने चौकारासह आपल्या फटकेबाजीला सुरुवात केली. ज्यानंतर इशान किशन हा देखील फॉर्मात आला. पण चांगला खेळ सुरू असतानाच इशानला ओबेड मकाय याने बाद केले. यावेळी भारताची धावसंख्या 28 – 2 बाद अशी होती.

- Advertisement -

पण, यानंतर मैदानात आलेल्या तिलकने भारताला जिंकण्याची नवी उमेद निर्माण केली. सुर्या आणि तिलक वर्माची जोडी उत्तम खेळी करत होती. ज्यामुळे ही जोडी भारताला विजय मिळवून देईल, असे वाटू लागले होते. परंतु यानंतर विंडीजच्या जेसन होल्डरने भारताला धक्का देत सूर्यकुमार यादवला बाद केले. पण तरी देखील त्यानंतर तिलक वर्माने आपली भेदक खेळी सुरू ठेवली होती. पण त्याची ही खेळी फार वेळ चालू शकली नाही, कारण रोमारियो शेफर्ड याने तिलकला बाद करत त्याचा डाव 22 चेंडूत 39 धावांवर आटोपला.

यानंतर भारताला सामना जिंकवून देण्याची जबाबदारी होती ती हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन या दोघांवर. पण सुर्याला बाद करणाऱ्या जेसन होल्डरने आक्रमक खेळी करत पांड्याला क्लीन बोल्ड करत पुन्हा माघारी पाठवले. ज्यामुळे भारताचा जवळपास तिथेच संपुष्टात आला. पांड्या बाद झाल्यानंतर एकमेव आधार असलेल्या संजू सॅमसनही धावचीत झाला आणि भारताला अवघ्या चार धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -