घरताज्या घडामोडीPM-KISAN योजनेची डेडलाईन जवळ येतेय, काय आहे मुदत ? कशी कराल नोंदणी...

PM-KISAN योजनेची डेडलाईन जवळ येतेय, काय आहे मुदत ? कशी कराल नोंदणी आणि अर्ज ?

Subscribe

प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेला नुकतीच दोन वर्षे पुर्ण झाली. पंतप्रधान किसान योजनेची सुरूवात २४ फेब्रुवारीला झाली होती. यंदाच्या वर्षीची किसान सन्मान निधीची डेडलाईन जवळ आली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा आहे, त्यांना नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे. योजनेच्या यशस्वी नोंदणीनंतरच पहिला टप्पा हा २ हजार रूपयांच्या स्वरूपात साधारणपणे होळीनंतर म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यात अपेक्षित आहे. या संपुर्ण योजनेसाठी कशी नोंदणी कराल ? कधीपर्यंत योजनेसाठीची नोंदणी करता येणार आहे ? योजनेचे पैसे कोणत्या टप्प्यात आणि किती मिळणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती.

पीएस किसान निधी योजना आहे तरी काय ?

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) योजनेची सुरूवात ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१९ साली करण्यात आली. देशभरातील शेतजमीन असणाऱ्या शेतकरी घटकाला आर्थिक आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षापोटीची ठराविक रक्कम देण्याचे या योजनेत जाहीर केले. योजनेच्या माध्यमातून वर्षापोटी एकुण ६ हजार रूपये तीन वेळा देण्यात येतात. सरासरी चार महिन्याच्या फरकाने हे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट अशा पद्धतीने पोहचतात.

- Advertisement -

PM-KISAN योजनेची पात्रता काय ?

ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे असे सगळे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यामुळे जमीन नावावर असणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ घेता येतो.

एकाच वर्षात कितीवेळा योजनेचा लाभ मिळतो ?

PM-KISAN योजनेअंतर्गत सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देण्यात येतो. त्यामध्ये वर्षापोटी एका कुटुंबाला साधारणपणे ६ हजार रूपये आर्थिक मदतीच्या स्वरूपात देण्यात येतात. प्रत्येक चार महिन्यांनी असे तीन हप्त्यात प्रत्येक २ हजार रूपयांचा हप्ता याप्रमाणे हा निधी देण्यात येतो. याआधीचा योजनेचा पहिला टप्पा हा १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ होता. तर दुसरा टप्पा १ एप्रिल २०१९ ते ३१ जुलै २०१९ होता. तर तिसरा टप्पा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर असा होता.

- Advertisement -

PM-KISAN योजनेसाठी नोंदणी कशी कराल ?

PM-KISAN योजनेसाठी https://pmkisan.gov.in/ वेबसाईटला व्हिजिट करा.

उजव्या बाजूचा फार्मर कॉर्नर टॅप क्लिक करा

पहिल्यांदाच नोंदणी करत असाल तर https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx या लिंकवर क्लिक करा.

खालील स्टेप्सचा वापर करा :

1. आधार नंबर नमुद करा
2. उजव्या बाजूचा इमेज कोड नमुद करा
3. तुमचे राज्य शोधा आणि निवडा

वरील तीन टप्प्यांची नोंदणी झाल्यानंतरच तुमचा वैयक्तिक तपशील फॉर्ममध्ये नमुद करा.

या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती आणि बॅंकेचा तपशील भरावा लागेल.

त्यानंतरच तुम्हाला संपुर्ण माहितीने भरलेला फॉर्म सबमिट करता येईल.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -