घरदेश-विदेशमोदीजी चेन्नईच्या बीचवर हातात काय घेऊन फिरत होते?

मोदीजी चेन्नईच्या बीचवर हातात काय घेऊन फिरत होते?

Subscribe

चेन्नई येथील समुद्रकिनारा स्वच्छ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात एक वस्तू दिसत होती. ती वस्तू नेमकी कोणती होती? याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन खुलासा केला आहे.

कालच नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथील महाबलीपूरम समुद्र किनारा स्वच्छ केल्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरून प्लास्टिकच्या बाटल्या, प्लेट्स आणि इचक कचरा उचलला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्र किनारा स्वच्छ केल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातात एक वस्तू दिसत आहे. ही वस्तू काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्या वस्तूबाबत खुलासा केला आहे.

पंतप्रधानांनी ट्विटरवर त्या वस्तूचा खुलासा केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “कालपासून चेन्नई येथील महाबलीपूरम समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करताना माझ्या हातात दिसणारी वस्तू नेमकी काय आहे? असा प्रश्न कालपासून अनेकजण विचारत आहेत. तर ती वस्तू अॅक्युप्रेशर आहे. जो मी नेहमी वापरतो. मी तो खूप उपयोगाचा वाटतो.”

- Advertisement -

अॅक्युप्रेशर रोलर म्हणजे काय? त्याचे आरोग्यदायी उपयोग कोणते?

अॅक्युप्रेशर रोलर रेफ्लेक्सोलॉजी तंत्र वापरतो, ज्याच्या वापराने तणाव दूर होण्यास तसेच इतर आजार बरे करण्यास मदत होते. अॅक्युप्रेशर रोलरच्या वापराने शरीरातील हात, पाय आणि डोक्यावरील रिफ्लेक्स पॉइंट्सवर दबाव निर्माण होऊन त्यामुळे तणाव आणि इतर आजार बरे होण्यास मदत होते. अॅक्युप्रेशर रोलरच्या वापराने ताण-तणाव दूर होऊन मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -