घरदेश-विदेशराज्यसभेच २५० वे अधिवेशन; पंतप्रधानांच अभिभाषण

राज्यसभेच २५० वे अधिवेशन; पंतप्रधानांच अभिभाषण

Subscribe

या अधिवेशनात 'मागील २५० सत्रांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्येतरे पाहिली, राज्यसभेची २५० सत्रे म्हणजे एक विचारधारा आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात ‘मागील २५० सत्रांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्येतरे पाहिली, राज्यसभेची २५० सत्रे म्हणजे एक विचारधारा आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या २५० सत्रानिमित्त त्यांनी राज्यसभेला संबोधित केले. तसेच ते पुढे म्हणाले की, आतापर्यंतचा राज्यसभेचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे राज्यसभा ही देशाची विकासयात्रा असून कर्तुत्ववान नेत्यांनी आतापर्यंत राज्यसभेचे नेतृत्व केले आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.

 

- Advertisement -

काय म्हणाले पंतप्रधान?

‘भारताची विविधतेतील एकता राज्यसभेत दिसते. तसेच भारताच्या फेडरल व्यवस्थेचे राज्यसभा हे प्रतिबिंब असून बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशाला खूप मोठा फायदा झाला आहे’, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत. त्याचबरोबर ‘राज्यसभेच्या गौरवशाली प्रवासात मला सहभागी होता आले याचा मला अभिमान वाटतो. तसेच स्थायीभाव आणि वैविध्य हे राज्यसभेची वैशिष्ट्ये आहेत. अशी राज्यसभा कधीही भंग होणार नाही, असेही ते पुढे म्हणाले आहेत. भारतातली एकता कायमच राज्यसभेत पाहण्यास मिळाली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कौतुक

‘मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजू जनता दल या पक्षांचे कौतुक करतो. कारण त्यांनी कायमच या सभागृहाची परंपरा पाळली आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांसमोर आंदोलन देखील केली नाहीत, हे विशेष. त्यामुळे इतर पक्षांनी त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे’, असे ही पुढे मोदी म्हणाले आहेत.


हेही वाचा – Video: धक्कादायक! व्हिडिओ शूटिंगच्या नादात मित्रालाच गमावले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -