घरदेश-विदेशVideo: धक्कादायक! व्हिडिओ शूटिंगच्या नादात मित्रालाच गमावले!

Video: धक्कादायक! व्हिडिओ शूटिंगच्या नादात मित्रालाच गमावले!

Subscribe

मित्र पोहोत असल्याचे दिसत असताना देखील मित्र त्याचे चित्रीकरण करत राहिला. मात्र, या चित्रीकरणात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.

कर्नाटक मधील कुलबर्गी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मित्राने व्हिडिओ शूट करण्याच्या नादात दुसऱ्या मित्राचा जीव गमावल आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून यामध्ये २२ वर्षीय तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही घटना समोर आली आहे. जाफेर अयूब असं या पीडित तरुणाचे नाव असून तो मिजगुरी भागातील रहिवासी आहे. कलाबुर्गी जिल्हातील तलावजवळ ही घटना घडली आहे.

- Advertisement -

नक्की काय घडलं?

शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास काही मित्र तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. सगळे मित्र पोहत असताना एक जण व्हिडिओ शूट करत होता. जेव्हा जाफेरने पोहण्यासाठी तलावात उडी मारली तेव्हा तो काही वेळानंतर हळूहळू बुडू लागला. हे सर्व व्हिडिओत दिसत असून सुद्धा त्याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला नाही. तो व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यग्र होता. त्याचवेळेस जाफेरने तलावाजवळ असलेल्या मित्राकडे मदतीचा हात मागितला. पण त्या मित्राने फक्त मदत करण्याचा प्रयत्न केला आणि मागे गेला. एवढं सगळं दिसत असून ही जाफेरचा मित्र हा फक्त व्हिडिओ शूटिंग करत राहिला. १० मित्रांसोबत पोहण्यासाठी जाफेर गेला होता. मात्र या मित्रांपैकी कोणीही त्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे आलं नाही.

माहितीनुसार, जाफेरला पोहता येत नव्हतं. त्यानं कोणतीही सेफ्टी न घेता तलावात उडी मारली होती, असं सांगण्यात आलं आहे. अशा प्रकारच्या घटना या अगोदर कर्नाटकमध्ये घडल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गिरगावात शिवसेनेचं मेट्रोविरोधात आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -