घरAssembly Battle 2022Punjab Assembly Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १४ फेब्रुवारीला पंजाब दौरा, जालंधरमध्ये...

Punjab Assembly Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १४ फेब्रुवारीला पंजाब दौरा, जालंधरमध्ये मोठी सभा होणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारी रोजी पंजाबचा दौरा करणार आहे. यावेळी जालंधरमध्ये ते मोठी निवडणूक रॅली घेणार आहेत. तसेच पंजाबच्या नागरिकांशी ते थेट संवाद साधणार आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस जीवन गुप्ता यांनी मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील लोकांशी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यासाठी ते जालंधरमध्ये मोठी सभा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पंजाबमधील मोदींची ही रॅली प्रत्यक्ष जाहीर सभा असणार आहे.

पीएम मोदींनी मंगळवारी लुधियानामध्ये व्हर्च्युअल रॅली घेतली. यामध्ये सहा विधानसभा जागांच्या मतदारांना त्यांनी संबोधित केलं. लुधियानामध्ये १८ ठिकाणी मोदींच्या आभासी रॅलीचे प्रक्षेपण दाखवण्यात आले. रॅली यशस्वी पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी पंजाबचे निवडणूक प्रभारी गजेंद्र शेखावत यांच्यावर होती. लुधियाना उत्तर मतदारसंघातील उमेदवार प्रविण बन्सल यांच्यावतीने घंटाघर येथील रॅलीत शेखावत स्वत: उपस्थित होते.

- Advertisement -

पंतप्रधानांनी काल (मंगळवार) घेतलेल्या व्हर्च्युअल रॅलीत लुधियाना आणि फतेहगढ साहिबच्या मतदारांना संबोधित केलं. यावेळी पंजाबमधील शीख हत्याकांडासाठी काँग्रेसला जबाबधार धरले. काँग्रेसने सत्तेसाठी पंजाबला दहशतीच्या आगीत ढकलले, असं देखील मोदी म्हणाले.

भाजप कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल युनायटेड यांच्यासोबत युती करून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस करतारपूर साहिब भारतात ठेवू शकले नाही. पण त्यांनी येथील मार्ग खुला केला,असं म्हणाले. त्याचप्रमाणे पंजाबमधील पायाभूत सुविधांवर ५ वर्षांत १ लाख कोटी रुपये खर्च केले जातील, असं आश्वसन देखील मोदींनी पहिल्या रॅलीत दिली. त्यानंतर आता ते १४ फेब्रुवारीला पंजाब दौरा करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : पुण्याच्या दाट धुक्यातही महापारेषणच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न, केला वीजपुरवठा सुरळीत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -