PM Narendra Modi : राजकीय पक्षातील घराणेशाही हाच लोकशाहीला मोठा धोका – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशातील राजकीय पक्षांमध्ये मुलगा कसाही असो, तोच पुढचा अध्यक्ष होईल, अशी परिस्थिती अनेक घराण्यांमध्ये आहे. अशावेळी सर्वात मोठ नुकसान होत ते म्हणजे टॅलेंटचे. अनेकदा असे पक्ष हे तरूणांना राजकारणात येण्यापासून रोखतात, ज्यामुळे तरूण नेतृत्वाचे नुकसान होते, अशी प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकीय पक्षांमधील घराणेशाहीवर हल्लाबोल केला आहे.

देशातील घराणेशाहीवर बोलताना मोदी म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये दोन पक्ष आहेत. हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडू एका कुटुंबाशी संबंधित हे पक्ष आहेत. हाच लोकशाहीला सर्वात मोठा धोका असल्याचे ते म्हणाले. कुटुंबांशी संबंधित पक्ष हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वाच्या विरोधातच असतात. त्यामुळे अशा पक्षांना देशाच्या बाबतीत काहीही फरक पडत नाही.

उत्तर प्रदेशात सुरक्षेचे वातावरण

जेव्हा उत्तर प्रदेशात याआधीचा अनुभव मुली सांगतात, तेव्हा अतिशय भीतीचे वातावरण होते असा एक काळ होता. पण आता सायंकाळी अंधार झाल्यानंतरही बाहेर पडू शकतात, हे उत्तर प्रदेशातील सुरक्षेचे द्योतक आहे. उत्तर प्रदेशात एकेकाळी गुंडगिरी फोफावली होती. पण आता योगींनी सुरक्षेला प्राधान्यता दिली आहे. भूतकाळात लोकांनी माफियाराजचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आधीची आणि बदललेली परिस्थिती उत्तर प्रदेशने जवळून पाहिली आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीवर अनेकदा सर्वोच्च न्यायालयानेही समित्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारनेही या समित्यांची नेमणूक केली आहे. योगींनी सुरक्षेला प्राधान्य दिल्यानेच उत्तर प्रदेशात सुरक्षिततेचे वातावरण आहे.

हे योगींचे क्रेडिट

योगींनी अथक प्रयत्नामधून उत्तर प्रदेशात योजना आणल्या. अनेकदा या योजनांचे श्रेय घेण्यासाठी विरोधकही ही योजना चांगली आहे, असे सांगत योजनांचे क्रेडिट घेतात. पण एक प्रकारे हे सगळे योगींचे श्रेय असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

अनेक पराभवातून आम्ही जिंकलो

आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. निवडणुकीत अनेकदा पराभूत होऊनच आम्ही जिंकू लागलो. आम्ही अनेक पराजय पाहिले. जमानत जप्त होताना पाहिली. निवडणुकीत मी पाहिले होते जनसंघच्या काळात जेव्हा पक्षाचे निशाण दिवा होते. सगळे पराभूत झाल्यानंतरही कुठे तरी मिठाई वाटली जात होती. मी विचारल्यावर कळाले की तिघांचे डिपॉझिट वाचल्याचे कळाले. त्यामुळे मिठाई वाटली जात होती. त्या काळापासून आम्ही निवडणूका पाहत आहोत. त्यामुळे आताचे यश हे एकाएकी आलेले यश नाही. आम्ही जिंकतो म्हणजे आमची मातीशी नाळ घट्ट असते याचेच हे द्योतक असते.