घरदेश-विदेशकाहींकडून राजकीय स्वार्थासाठी पुलवामा हल्ल्याचा वापर; मोदींची विरोधकांवर टीका

काहींकडून राजकीय स्वार्थासाठी पुलवामा हल्ल्याचा वापर; मोदींची विरोधकांवर टीका

Subscribe

पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने पुलवामा हल्ल्याबाबत कबुली दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, आपले सैनिक शहीद झाले तेव्हाही काही लोक राजकारण करत होते. काहींकडून राजकीय स्वार्थासाठी पुलवामा हल्ल्याचा वापर केला, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यासाठी नरेंद्र मोदी गुजरातमध्ये असून मोदींनी केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदींनी यावेळी सिव्हील सर्व्हिसेस प्रोबेशनर्सना देखील संबोधित केलं. काही लोक दहशतवादाचं जाहीर समर्थन करत असून ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

“संचलन पाहताना पुलवामा हल्ल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं. पुलवामा हल्ला आणि वीर जवान शहीद झाले असताना काही लोक या दुखात सहभागी नव्हते हे देश विसरणार नाही. हे लोक पुलवामा हल्ल्यातही राजकीय स्वार्थ शोधत होते. त्यावेळी केलेली वक्तव्यं आणि राजकारण देश विसरू शकत नाही. देशाला इतकी मोठी जखम झाली असताना काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसलं. पण हे सर्व होत असतानाही मी सर्व आरोपांना झेललं. अनेक वाईट गोष्टी ऐकत राहिलो. माझ्या मनात वीर जवान शहीद झाल्याची जखम होती. पण काही दिवसांपूर्वी शेजारी देशातून ज्या गोष्टी आल्या आहेत. तेथील संसदेत ज्याप्रकारे सत्य स्वीकारण्यात आलं आहे त्याने या लोकांचा खरा चेहरा देशांसमोर आणला आहे,” असं मोदींनी म्हटलं.

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -