अंधेरीत भीषण अपघात: क्रेन बस स्टॉपवर कोसळून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी

Mumbai: 1 dead as crane collides with metro pillar at Andheri
अंधेरीत भीषण अपघात: क्रेन बस स्टॉपवर कोसळून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी

मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेसवर अंधेरी जवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. जोगेश्वरीहून बांद्राला जाणारी मेट्रोची क्रेन अंधेरीच्या गुंदावली भागातल्या बस स्टॉपवर कोसळली. यामध्ये बस स्टॉपवर उभी असलेल्या महिलेच्या अंगावर ही क्रेन कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच २ जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका मोठा होता की क्रेनचे दोन तुकडे झाले आहेत.

क्रेन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातातील मृत महिलेचे नाव फाल्गुनी पटेल असे होते. या महिलेसह बस स्टॉपवर असलेले आणखी दोघजण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर क्रेन चालक फरार झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


 हेही वाचा – जाहिरात होर्डिंगसाठी कळंबोलीत पिंपळाच्या झाडावर विषप्रयोग!