घरदेश-विदेशनरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? वाचा काय सांगतो अहवाल? राज्यातील 'या' नेत्याचंही नाव...

नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? वाचा काय सांगतो अहवाल? राज्यातील ‘या’ नेत्याचंही नाव चर्चेत

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तरार्धात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वोत योग्य नेते आहेत,असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 29 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, अमित शहा हे पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून सर्वात योग्य आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा क्रमांक लागतो.

लोकसभेच्या निवडणुका आठ ते नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. एनडीएसह विरोधकांची इंडिया आघाडी निवडणुकांची तयारी करत आहेत. निवडणुकांचे निकाल काय लागतील याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असेल. निवडणुकांचे निकाल काय लागतील याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असेल. इंडिया टुडे -सीव्होटर मूड ऑफ नेशन सर्व्हेने आपले काही अंदाज व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारी कोण असेल याबाबत यात सर्व्हे घेण्यात आला होता. या सर्व्हेतून नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असेल हेही सांगण्यात आलं आहे. (Politics Yogi Adityanath nitin Gadkari union home minister Amit Shah is the best suited to succeed prime minister narendra Modi Loksabha election 2024)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तरार्धात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वोत योग्य नेते आहेत,असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 29 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, अमित शहा हे पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून सर्वात योग्य आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा क्रमांक लागतो. 26 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांचं समर्थन केलं तर 15 टक्के लोकांनी नितीन गडकरींच्या बाजूने मतदान केले.

- Advertisement -

भाजप सरकारला हरवण्यासाठी प्रमुख 27 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी भाजपचा पराभव करू शकेल का? तसंच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता मोदींना पुन्हा निवडून देईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर इंडिया टुडे आणि सीव्होटरनं केलेल्या मूड ऑऱ नेशन्स या सर्व्हेतून समोर आली आहेत.

NDA ला बहुमत, पण जागा घटणार

जानेवारी 2023 मध्ये इंडिया टुडेने केलेल्या सर्वेनुसार, एनडीएला 298 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, आताच्या सर्वेनुसार एनडीए 306 जागांवर यश मिळवू शकते असं म्हटलं आहे. परंतु, 2019 मध्ये एनडीएने लोकसभा निवडणुकीत 357 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच सर्व्हेनुसार, भाजपा सत्ता स्थापन करण्यास यशस्वी झाली तरी त्यांची जागांची एकूण आकडेवारी कमी झालेली असेल. तर, दुसरीकडे नव्यानं स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला 193 जागा मिळतील असा अंदाज आहे. जानेवारीतील सर्व्हेक्षणानुसार, विरोधकांना 153 जााग मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

- Advertisement -

( हेही वाचा: एकीकडे आपण चंद्रावर, दुसरीकडे महागाईने त्रस्त; शरद पवारांचं मोदी सरकारवर टीकास्त्र )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -