घरताज्या घडामोडीभुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला दिले फटाक्याने भरलेले अननस; तडफडून झाला मृत्यू

भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला दिले फटाक्याने भरलेले अननस; तडफडून झाला मृत्यू

Subscribe

भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला फटाकेयुक्त भरलेले अननस खायला दिल्याने हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला आहे.

एका भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला फटाकेयुक्त अननस खाला दिल्याची अमानुष घटना केरळमध्ये घडली आहे. या घटनेमुळे हत्तीणीचा तिच्या बाळासह मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्तीण भुकेच्या शोधात होती आणि त्याच दरम्यान तिला फटाकेयुक्त अननस खायला दिले. तिने हे अननस खाल्ले असता तिच्या तोंडात फटाके फुटले तर काही फटाके पोटात फुटले आणि त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला.

नेमके काय घडले?

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही हत्तीणी भुकेने त्रस्त झाली होती. त्यामुळे ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. त्याच दरम्यान, काही स्थानिक लोकांनी तिला अननसाद्वारे फाटाके खायला घातले. भुकेने व्याकुळ झालेल्या हत्तीणीने लोकांवर विश्वास ठेवत ते अननस खाल्ले आणि थोड्याच वेळात तिच्या पोटात फटाके फुटले. यातच गर्भाशयात वाढणार्‍या मुलासह तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही वेदनादायक घटना सोशल मीडियावर पोस्ट केली आणि लगेचच त्या हत्तीणीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक चांगलेच संतापले.

- Advertisement -

हत्तीण बाळासाठी होती चिंतेत

या घटनेत हत्तीण गंभीर जखमी झाली होती. तिच्या तोंडाला आणि जिभेला जखमा झाल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले. मात्र, त्या आधीच हत्तीणीने आपले प्राण सोडले.

हत्तीणीने सर्वांवर विश्वास ठेवला. तिने अननस खाल्ल्यावर ती अस्वस्थ झाली आणि काही वेळाने ते फटाके पोटात फुटले आणि हत्तीण अस्वस्थ झाली. हत्तीणीला स्वत: साठी नव्हे, तर पोटातील बाळासाठीही त्रास झाला असावा. ती पुढच्या १८ ते २० महिन्यांत जन्म देणार होती. – मोहन कृष्णन; वन अधिकारी

- Advertisement -

हे कृत्य करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


हेही वाचा – हे बूट वापरा आणि कोरोनाला घाला आळा…सोशल डिस्टन्सिंगसाठी उत्तम पर्याय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -