घरदेश-विदेशराष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

Subscribe

आज राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी, आज पद्य पुरस्कार देऊन दिग्गजांचा सन्मान करण्यात येणार आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार पडणार असून ११२ पैकी ५६ जणांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार आहे. तर उर्वरित दिग्गजांना १६ मार्च रोजी पुरस्कार देण्यात येणार आहे.

या दिग्गजांचा करणार सन्मान

गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पद्मविभूषण हा पुरस्कार अभिनेता कादर खान यांना प्रदान करण्यात आला असून अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढिंडसा यांना पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित्त करण्यात आला आहे. तर प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित्त करण्यात येणार आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी ५० हजार नामांकन आली असून २०१४ पेक्षा २० पटीने वाढ झाली आहे. या पुरस्काराला उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदि उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

वाचा – वाचा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

वाचा – योग्य किंमतीत गुणवत्ता असेलेली औषधे हवी – रामनाथ कोविंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -