घरमनोरंजन‘महिला सशक्तीकरणा’वर भाष्य करणाऱ्या 'सावट'चा ट्रेलर लाॅंच

‘महिला सशक्तीकरणा’वर भाष्य करणाऱ्या ‘सावट’चा ट्रेलर लाॅंच

Subscribe

हुशार, संवेदनशील आणि करारी व्यक्तिमत्वाची आदिती ‘सत्या’चा शोध घेणारी, कणखर पोलिस अधिकारी आदिती देशमुखच्या भूमिकेत स्मिता दिसणार आहे.

जागतिक महिला दिन (८ मार्च) रोजी सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच दरम्यान महिला दिनाचे औचित्य साधत हितेशा देशपांडे, स्मिता तांबे आणि मंगलिक या तीन महिलांनी निर्मिती केलेल्या सावट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाॅंच झाले आहे. गेले काही वर्ष आपल्या भुमिकेमुळे स्मिता तांबे हिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता स्मिता एका ‘महिला सशक्तीकरणा’वर भाष्य करणाऱ्या चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ या चित्रपटाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस यांनी केले आहे.

- Advertisement -

स्त्रियांविषयीचा नवा दृष्टिकोन देणारं नवं पर्व

“सावट हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर आहे. बऱ्याचदा अशा धाटणीच्या चित्रपटात भुताटकी, हडळ, चेटकीणच लोकांना घाबरवते. नेहमी कथांमध्ये ‘वाईट शक्ती’म्हटले की स्त्री रूपचे असते असे आपण अनादी काळापासून कल्पनेत पाहतो. बाईला देवी म्हणून पूजणारे आपण क्षणात तिला हडळ म्हणून वाळीतही टाकतो, यावरच हा चित्रपट भाष्य करतो. त्यामुळे स्त्रीशक्तिला समर्पित करणाऱ्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर आम्ही लाँच केला. त्यातच योगायोगाने चित्रपटाच्या तिन्ही निर्मात्या स्त्रियाच असल्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी हा ट्रेलर लाँच करून स्त्रियांविषयीचा नवा दृष्टिकोन देणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात करावी, असे आम्हाला वाटले.”असे चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणाले.

कणखर पोलिस अधिकारीच्या भुमिकेत स्मिता

थ्रिलर धाटणीचा असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. “सावट चित्रपटात मी कणखर पोलिस अधिकारी आदिती देशमुखच्या भूमिकेत दिसणार आहे. हुशार, संवेदनशील आणि करारी व्यक्तिमत्वाची आदिती ‘सत्या’चा शोध घेताना येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला कणखरपणे दोन हात देते. पोलिस आहेत म्हणून आपल्या सहकाऱ्यांना साथ द्यायची आणि गुन्हेगार आहेत म्हणून त्यांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवायचा, अशी ती वागत नाही. तिच्यावर कोणी आपला प्रभाव टाकून तिची मतं बदलवू शकत नाही. अशापद्धतीने स्वत:ची लढाई खंबीरपणे लढणाऱ्या स्त्रियांविषयी मला जास्त आदर आहे. महिला दिनीच्याच आठवड्यात लाँच झालेला हा ट्रेलर रसिकांना आवडेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे चित्रपटाची निर्माती आणि अभिनेत्री स्मिता तांबे म्हणाले.

- Advertisement -

२१ मार्चला महाराष्ट्रात प्रदर्शित

हितेशा देशपांडे, स्मिता तांबे आणि शोभिता मांगलिक यांची निर्मिती असलेल्या ‘सावट’ चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २१ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -