घरदेश-विदेशभारताचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट - एन. राम

भारताचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट – एन. राम

Subscribe

'भारताचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट असून, राफेल खरेदीच्या संशयास्पद व्यवहारावरुन याची प्रचिती येते', असे मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईच्या नरिमन पाईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रविवारी ‘मुंबई कलेक्टिव्ह’ असा विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी देशातील भ्रष्टाचारावर भाष्य केले. ‘देशात सगळीकडेच भ्रष्टाचार आहे. मात्र, भारताचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल खरेदीच्या संशयास्पद व्यवहारावरुन याची प्रचिती येते’, असे मत एन. राम यांनी यावेळी व्यक्त केले. ‘राफेल: मोदीज नेमेसिस?’ या विषयाने परिसंवादाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या विषयाला धरुन बोलतेवेळी राम यांनी हे वक्तव्य केले. याव्यतिरिक्त सदर परिसंवादामध्ये सोशल मीडिया अँड सबव्हर्जन ऑफ डेमॉक्रसी, मिसिंग जॉब्ज, अटॅक ऑन कॉन्स्टिटय़ूशन डेमॉक्रसी, हिंदूइझिंग इंडियन डेमॉक्रसी, मिसलीडिंग स्टॅटिस्टिक्स, लेट्स टॉक अबाऊट सेक्युलॅरिझम आदी विषयांवरही तज्ज्ञांनी आपापली मते मांडली.

… म्हणून राफेल प्रकरणाला भ्रष्टाचाराची किनार

‘युरो फायटरसारखे चांगले पर्याय असताना सरकारने राफेलची निवड करण्यात केली. ‘द सॉल्ट’ कंपनीशी करार करताना समांतर वाटाघाटी केल्या गेल्या. विशेष म्हणजे या करारातील भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी काढून टाकण्यात आल्या. रशिया, अमेरिका यांच्याशी केलेल्या करारांमध्ये अशा तरतुदी नाहीत हे खरे असले, तरी ते त्या देशांच्या सरकारांशी केलेले करार असल्याने त्यात तशी गरज नव्हती. मात्र, राफेल खरेदीप्रकरणी भारत सरकारचा व्यवहार एका खासगी कंपनीशी होत होता. मग अशावेळी तरतुदी हटवण्याचं कारणचं काय? सवाल उभा राहतो. या आणि अशा अनेक संशयास्पद संदर्भांमुळे राफेल प्रकरणाला भ्रष्टाचाराची किनार आली आहे’, असे मत राम यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -

धर्मनिरपेक्षतेची व्याख्या चुकली आहे

‘आपली धर्मनिरपेक्षतेची व्याख्याच चुकली आहे’, असे मत लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी ‘लेट्स टॉक अबाऊट सेक्युलॅरिझस’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. तर, ‘हिंदूइझिंग इंडियन डेमॉक्रसी’ या विषयावर बोलताना विचारवंत कंवल भारती म्हणाले की, ‘धर्मामध्ये असमानता असते आणि संविधानासमोर आपण सर्व समान आहोत.’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -