घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार देशातील सर्वांत मोठ्या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार देशातील सर्वांत मोठ्या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन

Subscribe

रोजगार मेळाव्याअंतर्गत, भारत सरकारच्या ३८ मंत्रालये आणि विभागांमध्ये देशभरातील निवडक तरुणांची नियुक्ती केली जाईल. नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये विविध पातळ्यांवर सहभागी करून घेतले जाणार आहे.

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून आज सर्वांत मोठ्या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धाटन करणार आहेत. या रोजगार मेळाव्यात तब्बल ७५ हजार तरुणांना नियुक्त पत्र देऊन देशातील सर्वांत मोठ्या रोजगार अभियानाची सुरुवात पंतप्रधान करणार आहेत. या रोजगार मेळाव्यातून १० लाख तरुणांना रोजगार देण्याचं उद्दीष्ट्य ठेवण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेळावा सुरू होईल.

या मोहिमेअंतर्गत येत्या १८ महिन्यांत सर्व रिक्त पदे सरकार भरणार आहे. केंद्राचे सर्व विभाग यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभागांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले होते. रोजगार मेळाव्याअंतर्गत, भारत सरकारच्या ३८ मंत्रालये आणि विभागांमध्ये देशभरातील निवडक तरुणांची नियुक्ती केली जाईल. नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये विविध पातळ्यांवर सहभागी करून घेतले जाणार आहे.

- Advertisement -

यामध्ये गट-अ, गट-ब (राजपत्रित), गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क नियुक्ती तसेच केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, कनिष्ठ लिपिक (एलडीसी), लघुलेखक, पीए, उत्पन्न यांचा समावेश आहे. कर निरीक्षक, MTS सारख्या पदांचाही यात समावेश आहे. अनेक केंद्रीय मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, अनुराग ठाकूर आणि पीयूष गोयल सामील होणार आहेत. इतर मंत्रीही वेगवेगळ्या शहरात असतील, तर सर्व खासदार त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील तरुणांमध्ये असतील ज्यांना नियुक्तीपत्र मिळणार आहे.

३८ मंत्रालये आणि संबंधित विभागांमध्ये नोकऱ्या उपलब्ध 

- Advertisement -

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदींनी नुकत्याच दिलेल्या निर्देशांनुसार, सर्व मंत्रालये आणि विभाग “मिशन मोड” मध्ये मंजूर पदांवर रिक्त पदे भरण्यासाठी काम करत आहेत. देशभरातून निवडलेल्या नवीन भरती भारत सरकारच्या ३८ मंत्रालयांमध्ये आणि त्यांच्या संलग्न विभागांमध्ये केल्या जातील. नियुक्ती गट अ आणि ब (राजपत्रित), गट ब (अराजपत्रित) आणि गट क मधील विविध स्तरांवर सरकारमध्ये सामील होतील. ज्या पदांसाठी भरती केली जात आहे त्यात केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक आणि एमटीएस या इतर पदांचाही समावेश असणार आहे.

8.72 लाख पदे रिक्त होती

कार्मिक प्रशिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, आठ वर्षांत ७.२२ लाख लोकांना कायमस्वरूपी नोकऱ्या देऊनही 1 मार्च 2020 पर्यंत केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळए कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून त्यात संरक्षण मंत्री, गृहमंत्री, रेल्वे मंत्री यांच्यासह पाच मंत्र्यांचा समावेश आहे. सरकारने 2020-21 मध्ये 78,264 नोकऱ्या दिल्या आहेत.

एजन्सीमार्फत भरती केली जाते

ही भरती मंत्रालये आणि विभाग स्वतःहून किंवा UPSC, SSC आणि रेल्वे भर्ती बोर्डांसारख्या भर्ती एजन्सींद्वारे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -