घरदेश-विदेशराफेल करारावरून मोदींची काँग्रेसवर ट्विट 'फायर'

राफेल करारावरून मोदींची काँग्रेसवर ट्विट ‘फायर’

Subscribe

राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर ट्विटरवरून जोरदार हल्ला चढवला आहे. बोफर्स तोफ खरेदी प्रकरण आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणाचा हवाला देत मोदींनी यावेळी थेट काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर ट्विटरवरून जोरदार हल्ला चढवला आहे. बोफर्स तोफ खरेदी प्रकरण आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणाचा हवाला देत मोदींनी यावेळी थेट काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. राफेल करारामध्ये मामा क्वात्रोची आणि ख्रिश्चयन मिच्छेल नाही अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. शिवाय, काँग्रेस देशातील जनतेची दिशाभूल का करत आहे? असा सवाल मोदींनी विचारला आहे. न्यायव्येवस्थेबद्दल देखील काँग्रेस देशातील जनतेमध्ये अविश्वास पसरवत आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. PMO INDIA वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केले आहे. राफेल प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेसनं देखील जेपीसी चौकशी व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भारत फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार आहे. या खरेदी व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या काळात झालेल्या बोफर्स तोफ खरेदी आणि ऑगस्टा वेस्टलँड या हेलिकॉप्टर प्रकरणाचा हवाला देत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मैं कांग्रेस से जानना चाहता हूं कि क्या वो इसलिए भड़की हुई है, झूठ पर झूठ बोल रही है क्योंकि भाजपा सरकार जो रक्षा सौदे कर रही है, उसमें कोई क्वात्रोकी मामा नहीं है, क्रिश्चियन मिशेल नहीं है?

- Advertisement -

क्या इसलिए वो अब न्यायपालिका पर अविश्वास का माहौल पैदा करने में जुट गई है?: PM

— PMO India (@PMOIndia) 16 December 2018

- Advertisement -

राहुल गांधी यांनी माफी मागावी – शहा

राफेल खरेदी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. शिवाय, आरोप करताना माहिती कुठून मिळवली हे देखील स्पष्ट करावे अशी मागणी देखील शहा यांनी केली होती. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील राफेल कराराचा मुद्दा गाजला होता. सध्या राफेल खरेदी प्रकरणामध्ये काँग्रेस भाजपवर जोरदार टिका करताना दिसत आहे.

वाचा – राफेल करार घोटाळा – राहुल गांधींनी शोधून काढली ‘ही’ चूक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -