घरअर्थजगतRaghuram Rajan: रघुराम राजन अर्थव्यवस्थेवर पुन्हा बोलले; Stock market मधील तेजी म्हणजे...

Raghuram Rajan: रघुराम राजन अर्थव्यवस्थेवर पुन्हा बोलले; Stock market मधील तेजी म्हणजे…

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, शेअर बाजारातील तेजी हे भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे चित्र नाही तर ही एका भ्रामक भ्रामक कल्पना आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शेअर बाजारातील तेजी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक यशाचे मोजमाप नसून, हे आकडे पाहून भूलथापाना बळी पडू नका असेही आव्हान त्यांनी केले आहे. (Raghuram Rajan Raghuram Rajan again spoke on economy Stock market boom is…)

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, शेअर बाजारातील तेजी हे भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे चित्र नाही तर ही एका भ्रामक भ्रामक कल्पना आहे. RBI चे माजी गव्हर्नर राजन म्हणाले की, दलाल स्ट्रीटवर भारत 4 ट्रिलियन डॉलर्सचे बाजार भांडवल असलेल्या देशांच्या एलिट गटात सामील झाल्यामुळे आणि सेन्सेक्सने सर्वकालीन विक्रमी उच्चांक गाठल्याने भारताच्या व्यापक आर्थिक यशासाठी चांगले संकेत मिळत नाहीत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ब्रेकिंग द मोल्ड’ या पुस्तकात राजन आणि अर्थतज्ज्ञ रोहित लांबा यांच्या मते शेअर बाजार मॅक्रो इकॉनॉमीचे भ्रामक चित्र स्पष्ट करतो. मोठ्या अर्थव्यवस्था मोठ्या होत आहेत आणि लहान अर्थव्यवस्था लहान होत आहेत. असाही दावा त्यांनी केला आहे.

- Advertisement -

नोटबंदी, कोरोनाने मोडले लहान कंपन्यांचे कंबरडे

‘ब्रेकिंग द मोल्ड’ या पुस्तकात राजन यांनी लिहिले की, नोटाबंदी, कोरोना महामारी आणि जीएसटी यांसारख्या विविध कारणांमुळे देशातील मोठ्या कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे, तर छोट्या आणि अनौपचारिक क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी अत्यंत खराब आहे. परंतू देशातील व्यापक अर्थव्यवस्थेचे भ्रामक चित्र मांडणाऱ्या शेअर बाजारात केवळ मोठ्या कंपन्यांची कामगिरी दिसून येते. जून 2016 मध्ये नोटाबंदीच्या काही काळापूर्वीपासून, पोशाख आणि चामड्यांसारख्या रोजगार-केंद्रित क्षेत्रातील छोट्या कंपन्यांची संख्या घटली आहे.

हेही वाचा : ED-CBI : राजकीय भोजनभाऊंचे ‘खोके’ खाणे यंत्रणांकडून दुर्लक्षित, ठाकरे गटाची बोचरी टीका

- Advertisement -

यामुळे होत आहे भारताला फायदा

मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करणारे आरबीआयचे माजी गव्हर्नर म्हणाले की, जगात मंदीचा धोका कमी होत आहे. तर याच मंदीचा ओघ चीनमधून भारताकडे वाढत आहे. या कारणामुळे भारतात तेजी पाहायला मिळत आहे. जगातील सर्व देशांमध्ये शेअर बाजार तेजीत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये तणाव कायम आहे आणि उदयोन्मुख बाजारातील गुंतवणूकदार चीनला पर्याय शोधत आहेत. याचा फायदा भारताला होत आहे.

हेही वाचा : “PM Cares Fundची चौकशी करा”, Uddhav Thackeray यांची सरकारकडे मागणी

चीनपेक्षा भारत गुंतवणुकीसाठी सोईस्कर

चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. यावर्षी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 16 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे, दुसऱ्या तिमाहीत चीनमधील नवीन परकीय गुंतवणूक 25 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. भारतात सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी पातळी गाठली आहे. नोव्हेंबरमध्ये, सर्व सूचीबद्ध समभागांच्या मार्केट कॅपने चार ट्रिलियन डॉलर्स ओलांडले. बाजार मूल्याच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँग पहिल्या चारमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -