घरदेश-विदेशमोदी चौकीदार नाही तर भागीदर

मोदी चौकीदार नाही तर भागीदर

Subscribe

गांधी जयंतीनिमित्त वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी हे चौकीदार नाही तर भागीदार आहेत. निरव मोदी, विजय मल्या, मेहूल चोक्सी यांनी देशा बाहेर नेलेल्या पैशाला मोदीच जवाबदार आहे.

गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रमात राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. राफेल कंत्राट अनिल अंबानींना का देण्यात आला असा प्रश्न गांधीनी यावेळी केला. नरेंद्र मोंदी हे चौकीदार नाही तर भागीदार आहेत त्यांच्यामुळे भारताच्या बँका आज कर्जबाजारी होत आहेत. वर्ध्यातील सेवाग्राममधील सभेत बोलताना राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बोलतांना त्यांनी अनिल अंबानींवरही निशाणा साधला.

काय म्हणाले राहुल गांधी?

अनिल अंबानी यांच्या कंपनीवर ४५ हजार कोटींचे कर्ज आहे. मोदी ज्यावेळी फ्रन्सला राफेल करार करण्यासाठी गेले होते त्यावेळी अनिल अंबानीही त्यांच्यासोबत होते. फ्रॉन्सच्या राष्ट्रपतींनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. अनिल अंबानीच्या कंपनीवर ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज असूनही मोदींनी विमान बनवण्याचा कंत्राट त्यांना का दिला? हे प्रश्न ज्यावेळी मी लोकसभेत मोदींना विचारले त्यावर त्यांनी मौन पाळले. ५२६ कोटी किमतीचे विमान मोदींनी १६०० कोटींना विकत घेतले. सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनाही याबद्दल माहिती नव्हती. श्रीमंत लोकांनी देशाच्या बँकांकडून कर्ज घेतले व परेदशात पळून गेले. त्यांनी घेतलेले कर्ज अद्यापही बँकांना मिळाले नाही. मात्र देशातील शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे जातात त्यावेळी सरकार कर्जमाफ करत नाही. शेतमालाचा वीमा उतरवल्यानंतरही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळत नाही.

- Advertisement -

पंतप्रधानांनी दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत. या देशातील तरुणांना फुकट काही नकोय. त्यांना फक्त रोजगाराची संधी हवी आहे. परंतु, सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधान आपल्या भाषणांमधून जातीय तेढ निर्माण करतात. नोटबंदीमुळे गरिबांना त्रास झाला. अनिल अंबानी किंवा नीरव मोदी हे नोटबंदीच्या वेळी रांगेत उभे नव्हते. नोटबंदीमुळे काळा पैसा तर परत आला नाही मात्र लोकांना त्याचा त्रास झाला. छोटे उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांना खूप गैरसोय झाली. भारताबाहेर पेट्रोलचे दर ८० डॉलर आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर कमी होत आहेत मात्र भारतात पेट्रोलचे दर वाढत आहेत. मोदी सरकार जनतेकडून फक्त पैसा गोळा करत आहे. आमचा पक्ष गरिबांचा आणि पिचलेल्यांचा आहे त्यामुळे आम्ही कधीही ‘मन की बात’ करत नाही. जनतेशी थेट संवाद साधून आम्ही कोणताही निर्णय घेतो असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.

देशातील जनतेने नरेद्र मोदी यांना पंतप्रधान बनवले. परंतु, ते नापास झालेत. त्यामुळे जनतेने आता काँग्रेसला एक संधी द्यावी असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज, वर्धेतील सेवाग्राम येथे केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -