घरदेश-विदेशआमदार बलात्कार करतात, पण पंतप्रधान गप्प बसतात - राहुल

आमदार बलात्कार करतात, पण पंतप्रधान गप्प बसतात – राहुल

Subscribe

महिला सुरक्षेच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर महिला सुरक्षेच्या मुद्यावर टीका केली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये महिला कॉंग्रेस पार्टीच्या एका कार्यक्रमात महिला सुरक्षेच्या मुद्यावर ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशचा एक भाजप आमदार महिलेवर बलात्कार करतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही. एकिकडे मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची घोषणा देतात. मात्र जेव्हा खरच महिलांसाठी काहीतरी करुन दाखवण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी काहीच पाऊल उचलले नाही’. भाजप आमदारने महिलेवर बलात्कार केला, तरीही मोदी गप्पच बसतात, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

भाजपशी संघर्ष कराल, अशी आशा – राहुल गांधी

आपल्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ते कौतुक करताना म्हणाले, ‘महिला कॉंग्रेस अनेक बाबतीत आम्हाल मागे टाकून पुढे गेले आहे. महिला कॉंग्रेसने पक्षाच्या इतर विभागाला मागे टाकले आहे. कॉंग्रेसच्या महिला वेळ प्रसंगी रस्त्यावर, शहरात, गावात जागोजागी आंदोलन करत असतात. परंतु, जेव्हा भाजपशी लढण्याची वेळ येते, तेव्हा महिला कॉंग्रेस दिसत नाही’. त्यामुळे पुढील काही दिवसात महिला कॉंग्रेस भाजपशीही संघर्ष करेल, अशी आशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -