घरताज्या घडामोडीUkraine Russia War: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा राहुल गांधींनी व्हिडिओ केला पोस्ट, मोदी...

Ukraine Russia War: युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा राहुल गांधींनी व्हिडिओ केला पोस्ट, मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित

Subscribe

युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा सुरू असून गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगातील सर्व देश रशियावर जोरदार टीका करत आहेत. त्याचबरोबर या देशांनीही आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र, अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ शेअर करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधींनी शेअर केला व्हिडिओ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने त्यांना मायदेशी आणण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीयेत. नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी एमआयए आहेत.

- Advertisement -

राहुल गांधींनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थीनी तिच्या मोबाईलवरून भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्याला फोन करत असल्याचे सांगत आहे. अधिकारी तिचा फोन सतत डिस्कनेक्ट करत आहे, असा दावा विद्यार्थीनीने केला असून मेसेजला उत्तरही देत नाहीयेत. यामध्ये भारतीय विद्यार्थीचे म्हणणे आहे की, सर्व देशांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढले आहे. परंतु भारत सरकारने काहीही केलेले नाहीये. आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाहीये.

- Advertisement -

१०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

गेल्या पाच दिवसांपासून युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत लोक आपला जीव वाचवण्यासाठी बंकरचा आसरा घेत आहेत. स्थलांतरित लोकांना शक्य तितक्या लवकर देश सोडायचा आहे. आतापर्यंत हजारो भारतीय विद्यार्थी आणि इतर लोक युक्रेनमध्ये अडकल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहिली असता, युक्रेनमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारला कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.


हेही वाचा : मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांना मिळणार चालना, MMRDA च्या अर्थसंकल्पास मंजूरी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -