घरताज्या घडामोडीविना मास्क ट्रेन प्रवासासाठी आता ५०० रुपये दंड, रेल्वेकडून नवीन SOP जाहीर

विना मास्क ट्रेन प्रवासासाठी आता ५०० रुपये दंड, रेल्वेकडून नवीन SOP जाहीर

Subscribe

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. याच अनुषंगाने भारतीय रेल्वे आज एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर मास्क न घातलेल्यांकडून ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. फेस मास्कसाठीची हे आदेश पुढील ६ महिन्यांसाठी अनिवार्य असेल. शिवाय रेल्वेने नव्या मार्गदर्शनक सूचना जारी केल्या आहेत. रेल्वे बोर्डचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले की, ‘ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी कोरोना निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. तसेच प्रवाशांना केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या कोरोना मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे अनिवार्य आहे.’

- Advertisement -

सध्या कोरोना काळ असल्यामुळे स्वच्छतेच्या अनुषंगाने रेल्वे प्रवासादरम्यानची जेवणाची सेवा बंदी केली होती आणि रेडी टू ईड अशी जेवणाची व्यवस्था सुरू केली होती. मास्क, सॅनिटायझर, किट अशा अनेक प्रकारच्या गरजेच्या वस्तू स्टेशनवरील मल्टी पर्पस स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

रेल्वे सध्या प्रति दिन जवळपास एकूण १ हजार ४०२ स्पेशन ट्रेन चालवत आहे. तर एकूण ५ हजार ३८१ उपनगरीय ट्रेन आणि ८३० पॅसेंजर ट्रेन सेवेत सुरू आहेत. याशिवाय २८ स्पेशल क्लोन ट्रेन सध्या चालवली जात आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेमध्ये एप्रिल-मे २०२१ दरम्यान ५८ ट्रेन (२९ जोडी) आणि ६० ट्रेन (३० जोडी)सोबत गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त ट्रेन चालवली जात आहे. या ट्रेन गोरखपुर, पटना, दरभंगा, गुवाहाटी, बरौनी, प्रयागराज, बोकारो, रांचा आणि लखनऊ इत्यादी ठिकाणांसाठी आहे.


हेही वाचा – Coronavirus India Updates: चिंताजनक! सलग तिसऱ्या दिवशी २ लाखांहून अधिक रुग्णवाढ, एकाच दिवसात १,३४१ जणांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -