Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Jalna Lathi Charge : सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका, चित्रा वाघ यांचे...

Jalna Lathi Charge : सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका, चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना आवाहन

Subscribe

मुंबई : जालन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून आता राजकीय शब्दरण रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात ट्विटर-वॉर रंगले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून भाजपा सरकारने या समाजाची क्रूर फसवणूक केली असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. तर, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली, परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली, असा आरोप खासदार सु्प्रिया सुळे यांनी केला आहे.

आरक्षण प्रश्न सोडवण्याचा स्ट्राइक रेट कमी

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत यावर पलटवार केला आहे. मराठा समाजासाठी ‘मगरमच्छ के आंसू’ ढाळण्यापेक्षा तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर, आज संपूर्ण मराठा समाज तुमचा आभारी राहिला असता. मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचे एवढेच तुमच्या सिलॅबसमध्ये आहे का? तुमचा सत्तेत राहण्याचा स्ट्राइक रेट अतिशय उत्तम असल्याचा अभिमान आहे, मग मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याचा स्ट्राइक रेट कमी असल्याचा कधी खेद का वाटला नाही? मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत का दाखविली नाही आपण? असे सवाल त्यांनी सुप्रिया सुळे यांना केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जालन्यातील घटनेवरून उद्धव ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा, म्हणाले – “एक फुल, दोन हाफ…”

राष्ट्रवादीती काहींनी साथ सोडली म्हणून…

ट्रिपल टेस्ट पूर्ण करणे, सामाजिक मागासलेपण सिद्ध करणे आणि कोर्टात लढाई लढणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. पण तुमचा प्रॅाब्लेम वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे हे तुमचे लक्ष्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही मंत्र्यांनी तुमची साथ सोडली म्हणून तुमची जळजळ होणे स्वाभाविक आहे. पण त्याचा राग काढण्यासाठी मराठा आंदोलकांच्या खांद्याचा वापर करू नये, अशी विनंती चित्रा वाघ यांनी केली आहे.

समाजकल्याणाच्या कामात रक्तपिपासू वृत्ती

तुमच्या कार्यकाळात मावळमध्ये प्रकल्पग्रस्तांवर गोळीबार केला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांचे रक्त तुमच्या हाताला लागले आहे. समाजकल्याणाच्या कामात तुमची रक्तपिपासू वृत्ती उफाळून येते, हा इतिहास आहे. आता मराठारक्षणाचा खोटा कळवळा दाखवत आहात? तेव्हा बंदुकीचा चाप ओढताना मात्र तुम्हाला कर्तव्यधर्माचा सोईस्कर विसर पडला होता. तेव्हा तुमच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, याचे स्मरण त्यांनी सुप्रिया सुळेंना करून दिले आहे.

हेही वाचा – विरोधकांनी तारतम्य बाळगायला हवे, जालन्यातील घटनेवरून चित्रा वाघ यांनी सुनावले

महाराष्ट्र आत्ताच कसा काय पेटतोय?

आत्ताही महाराष्ट्र इतके दिवस शांत होता, मग आत्ताच कसा काय पेटतोय, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. हे जाणूनबुजून घडवले जात असेल तर त्याचाही छडा लागायला पाहिजे. ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका ही नम्र विनंती, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -